औरंगाबाद-एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास बाजीराव गाडेकर यांना राष्ट्रपती पोलिस पदक जाहीर झाले. प्रजासत्ताक दिनानिमित्त पालकमंत्री सुभाष देसाई हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस उपनिरीक्षक रामदास गाडेकर यांनी विभागात २९ वर्षांची सेवा बजाविली आहे. या कार्यकाळात त्यांनी आजवर खून, सामूहिक अत्याचार, दरोडा, जबरी, नकली नोटा यासारखे विविध गुन्हे उघड केले आहेत. या विविध गुन्ह्यांतून पोलीस उपनिरीक्षक गाडकेर यांनी ५५३ आरोपींना अटक केलेली आहे. सध्या, ते एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल एप्रिल २०१२ मध्ये त्यांना पोलिस महासंचालक (मुंबई) पोलिस पदकाने सन्मानित करण्यात आले.
हेही वाचा-महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर
इमरान मेहंदी गँगचा केला पर्दाफाश-
नगरसेवक सलीम कुरेशी यांचे खून प्रकरण औरंगाबाद शहरात गाजले होते. या खून प्रकरणात गाडेकर यांनी सखोल तपास करून कुख्यात इम्रान मेहेंदी व त्याच्या ११ साथीदारांचे पाच खुनाचे गुन्हे उघड केले. शहरातील जवाहरनगर, जिन्सी, क्रांती चौक या पोलीस ठाण्यासह गुन्हे शाखेत त्यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे.
हेही वाचा-मुख्यमंत्र्यांकडून राष्ट्रपती पदक पटकवणाऱ्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन
दरम्यान, महाराष्ट्रातील 40 पोलिसांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले आहे. यात ४ पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ठ सेवा पदक मिळाले आहे. तर राज्यातील १३ पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस शौर्य पदक जाहीर झाले आहे.