ETV Bharat / city

कोरोना वॉरियर्स ; संचारबंदीत कोरोनाशी लढणाऱ्या पोलिसांसह कुटुंबियांना धोका, सुरू झाली तपासणी . . . - कोरोनाचा संसर्ग

पोलिसांची विशेष काळजी घेण्यासाठी एक महिना आधी पोलिसांना रोग प्रतिकार शक्ती चांगली असावी, यासाठी औषधांचा एक डोस देण्यात आला होता. त्यांनतर आता दुसरा डोस देण्यात येणार आहे. पोलिसांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांची देखील वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे.

pls
पोलिसांच्या कुटुंबियांची तपासणा करताना डॉक्टर
author img

By

Published : Apr 28, 2020, 11:33 AM IST

Updated : Apr 28, 2020, 11:47 AM IST

औरंगाबाद - कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संचारबंदीत धोका पत्करुन पोलीस दलातील जवान बंदोबस्ताचे कर्तव्य मोठ्या जबाबदारीने पार पाडत आहेत. मात्र नागरिकांची सुरक्षितता सांभाळणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा सर्वाधिक धोका आहे. हा धोका लक्षात घेता औरंगाबाद पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे.

माहिती देताना पोलीस उपायुक्त मीना मकवाना

राज्यात अनेक ठिकाणी पोलिसांना कोरोना झाल्याचे समोर आले आहे. पोलीस कर्मचाऱ्यांची काळजी घेण्याचा प्रयत्न गृहविभाग घेत आहे. रस्त्यावर दिवसरात्र नाकाबंदी असेल, किंवा शहरात घालण्यात येणारी गस्त असेल सुरक्षेची सर्व भिस्त पोलीस विभागावर आहे. अनेकांशी रोज येणाऱ्या संपर्कामुळे पोलिसांना संसर्ग होऊ नये, म्हणून पोलिसांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. यासाठी एक महिना आधी पोलिसांना रोग प्रतिकार शक्ती चांगली असावी, यासाठी औषधांचा एक डोस देण्यात आला होता. त्यांनतर आता दुसरा डोस देण्यात येणार आहे. पोलिसांच्या कुटुंबाची काळजी घेण्यासाठी त्यांची देखील वैद्यकीय तपासणी सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी दिली.

औरंगाबाद पोलिसांतर्फे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली आहे. पोलीस दलातील डॉक्टर आणि कर्मचारी पोलिसांच्या घरी जाऊन कोणाला काही आजार किंवा त्रास आहे, का याबाबत तपासणी करण्यात येत आहे. यानिमित्ताने कोरोनाबाबत जनजागृती केली जात आहे. पोलीस कर्मचारी कर्तव्यवरून घरी आल्यावर कोणती काळजी घेण्यात यावी. याबाबत तपासणीनंतर माहिती पोलीस कुटुंबीयांना डॉक्टर देत आहेत. पोलिसांच्या कुटुंबीयांच्या काळजी बरोबर पोलीस बंदोबस्तासाठी असताना देखील काळजी घेतली जात आहे. उन्हाचा पारा चढल्याने दुपारनंतर रस्त्यावर बंदोबस्तासाठी उभे राहणे अवघड होत आहे. त्यामुळे नाकाबंदी असलेल्या 50 ठिकाणी सावलीसाठी मंडप उभारण्यात आले आहे. त्याठिकाणी पाणी आणि फूड पॅकेट पोहोचवले जात आहेत. अशा पद्धतीने पोलिसांची काळजी घेत असल्याची माहिती पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांनी ईटीव्ही भारतला दिली.

Last Updated : Apr 28, 2020, 11:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.