ETV Bharat / city

वॉशरूमचा बहाणा करून प्रशपत्रिकेचे फोटो काढले, महिला परीक्षार्थीवर गुन्हा दाखल - case registered against female examinee

प्रश्नपत्रिकाचे मोबाईलमध्ये फोटो घेणाऱ्या परीक्षार्थी महिलेवर छावणी पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. रविवारी मिलिंद महाविद्यालयात ही घटना घडली. पर्यवेक्षक शांतीलाल दगडू राठोड यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

वॉश रूमचा बहाणा करून प्रशपत्रिकेचे फोटो काढले

author img

By

Published : Sep 5, 2022, 7:45 PM IST

औरंगाबाद - वॉशरूमला जायच्या निमित्ताने बाहेर जाऊन प्रश्नपत्रिकाचे मोबाईलमध्ये फोटो घेणाऱ्या परीक्षार्थी महिलेवर छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे (Photographs of question papers taken). रविवारी मिलिंद महाविद्यालयात ही घटना घडली. पर्यवेक्षक शांतीलाल दगडू राठोड यांनी फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.

छावणी पोलिसात गुन्हा दाखल - शहरात रविवारी एनडीए व एनएची परीक्षा पार पडली. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत ही परीक्षा होती. या परीक्षेत मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. मिलिंद कॉलेजमध्ये परीक्षा सुरू असताना एक परीक्षार्थी महिलेने वॉश रूमला जायचे कारण सांगितले. हे कारण सांगून ती बाहेर पडली. सदर महिला प्रश्नपत्रिका सोबत घेऊन गेली होती. या प्रश्नासंचाचे फोटो तिने घेतले. ती आल्यावर संशय आल्याने पर्यवेक्षक शांतीलाल राठोड यांनी तिचा मोबाईल तपासला. त्यात प्रश्नपत्रिकेचे फोटो दिसून आले. याप्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक केदार पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा - Murder story Udyam Nagar तंबाखूचा बार ठरला मृत्यूला कार, तंबाखू दिली नाही म्हणून कोल्हापुरात एकाचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.