औरंगाबाद - संसदेत आज सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात पेट्रोल आणि सोने महागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे वाहनधारकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तर सराफा व्यापाऱ्यांनाही कस्टम ड्युटीचा अतिरिक्त भार सहन करावा लागणार आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्य वाहनधारक आणि सुवर्णकारांनी नाराजी व्यक्त केली.
आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पामध्ये पट्रोल आणि डिझेलसह सोन्याच्या किमती वाढण्याचे संकेत देण्यात आले. यावर सर्वसामान्य औरंगाबादकरांना या सरकारकडून आता अपेक्षा राहिल्या नाही अशा प्रतिक्रिया वाहन चालकांनी दिल्या. तर पट्रोलचे भाव स्थिर ठेवले पाहिजे होते. वाटल्यास वेगळे अनुदान पेट्रोलसाठी देण्यात यावे, असे मतही वानधारकांनी व्यक्त केले. तर सुवर्णकारांनी या निर्णयाचा निषेध करीत आधीच जीएसटीमुळे आमची कंबर मोडली आहे. या बजेटमध्ये आमचा अपेक्षाभंग झाल्याची प्रतिक्रिया सराफा व्यावसायिकांनी दिल्या.