ETV Bharat / city

संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी - Shiv Sena Leader MP Sanjay Raut

संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्याशी करून धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अन्यथा शिवसेना भवनवर मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्याची धनगर समाजाची मागणी

author img

By

Published : May 11, 2021, 12:30 PM IST

Updated : May 11, 2021, 12:43 PM IST

औरंगाबाद - एका राजकीय पक्षाच्या नेत्या असलेल्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्याशी केल्याबद्दल खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करा. अशी मागणी सकल धनगर समाजच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देऊन करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल न झाल्यास, शिवसेना भवनवर मोर्चा काढण्याचा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने देण्यात आला आहे.

सकल धनगर समाजाचा इशारा

नाहीतर शिवसेना भवनवर मोर्चा काढू

'शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एका राजकीय पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची तुलना पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकर यांच्याशी करून धनगर समाजाच्या भावना दुखावल्या आहेत. संजय राऊत हे नेहमीच खोडकर भाष्य करून समाजाच्या भावना दुखावत असतात. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. जोपर्यंत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत धनगर समाज शांत बसणार नाही. तसेच लॉकडाऊन उघडण्याअगोदर गुन्हा दाखल न झाल्यास शिवसेना भवन वर मोर्चा काढू', असा इशारा सकल धनगर समाजाचे विभागीय अध्यक्ष अरुण रोडगे यांनी दिला आहे. शिवसेना नेते खा.संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सकल धनगर समाजाच्या वतीने पोलीस आयुक्तालयात निवेदन देण्यात आले आहे.

हेही वाचा - काश्मीर : अनंतनागमध्ये चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Last Updated : May 11, 2021, 12:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.