ETV Bharat / city

Kalam World Record : दीड वर्षाच्या कनक मुंदडाची कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

औरंगाबाद येथील कनक मुंदडा या दीड वर्षीय मुलीची चांगली स्मरणशक्ती पाहुन तिला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड ( Kalam World Record ) अवार्ड मंजूर झाला आहे. याची माहिती डॉ. अमर मुंदडा यांनी दिली आहे.

author img

By

Published : May 17, 2022, 1:57 PM IST

Kalam World Record
दीड वर्षाच्या कनक मुंदडाची कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद

औरंगाबाद - सध्याच्या काळात लहान मुलांना मोबाईलचे व्यसन लागत आहे, पुस्तकी अभ्यासपासून ते दूर होत असून याबाबत अनेक अभ्यासकांनी चिंता व्यक्त केला जात आहे. अशात औरंगाबादच्या मुंदडा कुटुंबीयांनी आपल्या मुलीच्या हाती लहानपणी पुस्तक दिले. आणि दीड वर्षाच्या कनकने वेगळ्या विक्रमाला गवसणी घातली. तिला कलाम वर्ल्ड रेकॉर्ड ( Kalam World Record ) अवार्ड मंजूर झाला आहे.

कनक मुंदडाच्या आईवडिलांची प्रतिक्रिया

आईने ओळखली आकलन शक्ती - कोविडची दोन वर्षे सर्वच मुले घरात बसून ऑनलाइन शिक्षण घेत होती. त्यात दीड वर्षाच्या कनकचा मोठा भाऊ देखील तसेच शिक्षण घेत होता. त्यावेळी कनक आपल्या भावाचे अभ्यास करताना केलेले शब्दांचे उच्चार खेळता खेळता ऐकत होती. एकदा कनकची आई ममता मुंदडा यांनी ती तोडक्या मोडक्या भाषेत उच्चारत असलेले शब्द आणि हातवारे पाहिजे. त्यावेळी त्यांना तिच्या स्मरणशक्तीचा अनुभव आला. ममता यांनी ही गोष्ट आपले पती डॉ. अमर मुंदडा यांना सांगितली. त्यावरून त्यांनी आपल्या मुलीला आपण ज्ञान देऊ असा निर्णय घेतला. इंग्रजी आणि मराठी मुळाक्षरे शिकवणाता तिने खुप लवकर ती आत्मसात केली. त्यामुळे ममता आणि अमर मुंदडा यांना तिच्या स्मरणशक्ती बाबत आत्मविश्वास आला. आणि त्यांनी तिला अजून शिकवण्याचे ठरवले.

'कनक'ने आत्मसात केल्या अनेक गोष्टी - कनकची आई ममता मुंदडा यांनी तिचा अभ्यास घेऊन अनेक गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली. तिने त्या सहजपणे आत्मसात केल्या. कनकच्या आईने तिला एबीसीडी, विविध मुळाक्षरे, 21 देशांचे राष्ट्रध्वज, प्राण्यांची नावे, फळे, फुलांची नावे, पक्षी, भाज्या विविध रंग, 1 ते 10 पर्यंत चे नंबर, महापुरुषांच्या माहिती हे सर्व तिला सांगितले आणि तिने हे सर्व काही क्षणात स्मरणात ठेवले. त्यामुळे पालकांना तिचं खूप कुतूहल वाटले. टीव्ही आणि मोबाईल पासून मुलांना दूर ठेवल्यास त्यांच्या सुप्त गुणांचा माग घेता येईल अशी आशा ममता मुंदडा यांनी व्यक्त केली.

कनकची कलाम वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद - चांगली स्मरण शक्ती असलेल्या मुलांसाठी कलाम वर्ल्ड रेकॉर्ड अवार्ड दिला जातो, अशी माहिती डॉ. अमर मुंदडा यांना ( Kanak Mundada recorded in Kalam World Record ) मिळाली. त्याबाबत त्यांनी माहिती घेऊन ऑनलाइन पद्धतीने त्यासाठी नामांकन भरले. त्यावेळी त्यांना कनकचे विडिओ देण्याबाबत सांगण्यात आले. त्यांनी कनक महापुरुषांचे फोटो, भाज्यांचे प्रकार, विविध देशांचे झेंडे ओळखतानाचे व्हिडिओ चित्रित करून पाठवले. कनकची तल्लख बुद्धी पाहता, तिचे नामांकन स्वीकारत अवघ्या दीड वर्षाची असलेल्या कनकची नोंफ कलाम वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये करण्यात आली. असेच आणखी काही पुरस्कार बाबत आम्ही नोंद केली असून त्याबाबत तिची तयारी असल्याची माहिती कनकचे वडील डॉ. अमर यांनी दिली.

हेही वाचा - Gyanvapi Mosque : ज्ञानवापी मशिदीत सापडलेली रचना शिवलिंग नव्हे, ते तर कारंजे : AIMIM प्रमुख ओवेसींचा दावा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.