ETV Bharat / city

कला शिक्षकाचे एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र काढून अभिवादन - औरंगाबाद एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र

या प्रयोगाची 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळेस खूप जास्त मर्गदर्शक ठरलेत. वर्तमानात आणि भविष्यात देखील अर्थकारणात द प्रॉब्लेम ऑफ रुपी मधील मूल्य हे मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना आगळ्या- वेगळ्या कलात्मक पद्धतीने अभिवादन केले अशी माहिती राजेश निंबेकर यांनी दिली.

on one rupee coin of art teacher greetings by colorful profile of dr babasaheb ambedkar in aurangabad
कला शिक्षकाचे एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र काढून अभिवादन
author img

By

Published : May 4, 2022, 5:11 PM IST

Updated : May 4, 2022, 7:44 PM IST

औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती जिल्ह्यातील वेग-वेगळ्या गावात वेगवेगळ्या पद्धतीने अभिवादन करुन साजरी करण्यात येत आहे. श्री शंकरसिंग नाईक हायस्कूल येथील कलाशिक्षक राजेश निंबेकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलात्मक अभिवादन केले.

कला शिक्षक राजेश निंबाळकर यांचे एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र काढून अभिवादन
एक रुपयाच्या नाण्यावर काढले चित्र - राजेश निंबाळकर या कला शिक्षकाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. आंबेडकर यांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना कलात्मक अभिवादन केले. 1.5 त्रिज्या असलेल्या एक रूपयाच्या नाण्यावर 35 मिनीट आणि 15 सेकंदात हे व्यक्तिचित्र रंगवून पूर्ण करण्यात आले आहे. जगातील हा पहिलाच प्रयोग आहे, अशी माहिती कला शिक्षक राजेश निंबाळकर यांनी दिली.या नाण्याची रेकॉर्ड मध्ये नोंद - या प्रयोगाची 'इंटरनॅशनल बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड' मध्ये नोंद झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ लिहिला आणि या ग्रंथातील मार्गदर्शक तत्वे भारतीय रिझर्व बँकेच्या स्थापनेच्या वेळेस खूप जास्त मर्गदर्शक ठरलेत. वर्तमानात आणि भविष्यात देखील अर्थकारणात द प्रॉब्लेम ऑफ रुपी मधील मूल्य हे मार्गदर्शक ठरणार आहेत. म्हणूनच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून एक रूपयाच्या नाण्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे रंगीत व्यक्तिचित्र रेखाटून त्यांना आगळ्या- वेगळ्या कलात्मक पद्धतीने अभिवादन केले अशी माहिती राजेश निंबेकर यांनी दिली.यापूर्वी देखील अनोख्या पद्धतीने अभिवादन - यापूर्वी देखील राजेश निंबेकर यांनी पिंपळाच्या पानावर गौतम बुद्ध ची रांगोळी काढून विश्वविक्रम केला होता. त्याचीदेखील 'ओएमजी बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये नोंद झाली होती .या प्रयोगामुळेआता राजेश निंबेकर यांच्या नावावर दोन विश्व विक्रमाची नोंद झाली आहे. राजेश निंबेकर यांनी यापूर्वी देखील अनेक कलांच्या माध्यमातून फलक लेखन ,रांगोळी चित्र, पोट्रेट, नाट्य,नृत्य, काव्यलेखन, गायन, या कलेच्या माध्यमातून महामानवांचे विचार समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Last Updated : May 4, 2022, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.