औरंगाबाद - बजाजनगर परिसरातील बौध्द विहार येथे झोपण्यास जागा दिली नाही म्हणून एका वृद्धाचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना आज रात्री घडली.दरम्यान एम.आय.डी.सी.पोलिसांनी अवघ्या तिन तासात आरोपीला पकडले. सोमीनाथ भुरा राठोड, (वय-60) असे मृताचे नाव आहे तर याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजू गडवे (२३ वर्ष) याला अटक केली आहे.
नेमका काय घडलं -
पृष्णेम्यर हॉस्पिटलजवळ पद्यरपाणी बौध्दविहार गेटजवळ, बजाजनगर सोमीनाथ भुरा राठोड, (वय-60, रा. आडगाव पळशी, ता.जि. औरंगाबाद) हे झोपले होते. शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास भारत राजू गडवे, (वय-23 वर्ष, रा. सावित्रीबाई फुलेनगर, वडगाव कोल्हाटी, ता.जि. औरंगाबाद) हा नशेत तर्र होऊन तिथे आला. यावेळी मृत सोमनाथ यांच्याशी भारत गडवे याने हुज्जत घातली. दरम्यान त्यांच्यात झोपण्याच्या जागेवरून वाद झाला. यावेळी दोघांमध्ये बाचाबाची होऊन वाद विकोपाला गेला. यावेळी नशेत असलेल्या भारतने सोमनाथ यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा खून केला. सोमनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी भारत हा घटनास्थळावरून पसार झाला.
दरम्यान घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान मोबाईल फॉरेन्सिक इन्वेस्टीगेशन व्हेन, डॉग स्कॉड यांना पाचारण करण्यात आले. बेशुद्ध व्यक्तीची झडती घेतली. यावेळी खिश्यात मिळालेल्या चिठ्ठीमुळे जखमीची ओळख पटली. त्यांना घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
MIDC पोलिसांनी तीन तासात केला गुन्हा उघड -
दरम्यान midc सहपोलीस निरीक्षक गौतम वावळे व त्यांच्या विशेष पथकातील अंमलदारांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून सीसीटिव्ही फुटेज तपासले. सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून प्रताप चौक येथे सापळा रचून भारत राजू गडवे याला पकडले. यावेळी विचारपूस केली असता. रात्री 1 च्या सुमारास फुटपाथवर झोपण्याच्या कारणावरून सोमनाथ राठोड याच्या डोक्यात दगड टाकून त्यास जिवे ठार मारल्याचे कबूल केले. याप्रकरणी एम.आय.डी.सी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोउपनि सतीष पंडीत करत आहेत.