ETV Bharat / city

रावसाहेब दानवे-नारायण राणेंसारखे लोक मोदींसह संघाला कसे चालतात? -चंद्रकांत खैरे - Narayan Rane

यापुढे नारायण राणेंना मराठवाड्यात पाय ठेऊ देणार नाही, तसेच, राणे मराठवाड्यात आलेच तर त्यांना सरळ करू असा इशारा शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. दरम्यान, संघाला राणे आणि दानवेसारखे लोक कसे चालतात असा संतप्त सवालही खैरे यांनी यावेळी विचारला आहे.

शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे
शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे
author img

By

Published : Aug 24, 2021, 6:57 PM IST

औरंगाबाद - यापुढे नारायण राणेंना मराठवाड्यात पाय ठेऊ देणार नाही, तसेच, राणे मराठवाड्यात आलेच तर त्यांना सरळ करू असा इशारा शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे यांनी दिला आहे. दरम्यान, संघाला राणे आणि दानवेसारखे लोक कसे चालतात असा संतप्त सवालही खैरे यांनी यावेळी विचारला आहे.

शिवसेना उपनेते चंद्रकांत खैरे पत्रकारांशी बोलताना
राणे यांच्या मुख्यमंत्र्यांवरील वक्तव्याने खैरे संतप्त

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे संतप्त झाले आहेत. तसेच, राणे, रावसाहेब दानवेंसारखे लोक मोदींना कसे चालतात असा प्रश्न खैरे यांनी उपस्थित केला आहे. केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी मोदींना आणि राहुल गांधी यांना बैल संबोधले. आता नारायण राणे असे बेताल वक्तव्य करत आहेत. असे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह संघाला कसे चालतात असही खैरे म्हणाले आहे.

'राणे यांना मराठवाड्यात येऊ देणार नाही'

नारायण राणे यांच्या वक्तव्यानंतर राज्यभर पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बाबतीत अशी भाषा करणाऱ्या नारायण राणेला मराठवाड्यात येऊ देणार नाही. असा इशारा खैरे यांनी दिला आहे. राणे चेंबूरचा गुंड होता. मात्र, आता नाही. शिवसैनिक त्याला त्याची जागा दाखवतील, अशी संतप्त प्रतिक्रिया खैरे यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.