ETV Bharat / city

प्रेयसीची छेडछाड केल्याच्या कारणातून डोक्यात दगड टाकून हत्या - औरंगाबाद सिडको पोलीस स्टेशन

प्रेयसीची छेडछाड केल्याच्या कारणातून डोक्यात दगड टाकून हत्या केल्याची घटना जाधववाडी भाजीमंडई परिसरात घडली आहे. या हत्येप्रकरणात सिडको पोलिसांनी २३ वर्षीय युवकाला अटक केले आहे.

आरोपी अटकेत
आरोपी अटकेत
author img

By

Published : Jun 8, 2021, 8:38 AM IST

औरंगाबाद : जाधववाडी भाजीमंडई परिसरात झालेल्या हत्येचा छडा लागला आहे. भाजीमंडईत एकाची दगडाने ठेचून हत्या केल्याची घटना घडली होती. २१ मे रोजी सकाळी आठच्या सुमारास ही घटना उघडकीस आली होती. दादाराव सांडू सोनवणे (४५, रा. खेरवाडी, जाधववाडी) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी ७ जून रोजी सिडको पोलिसांनी मिसारवाडी येथून मिस्त्री काम करणाऱ्या युवकाला अटक केली आहे.

प्रेयसीलाही घेतले पोलिसांनी ताब्यात

सुनील जयसिंग निंभोरे (२३, रा. मिसारवाडी) असे आरोपीचे नाव आहे. प्रेयसीची छेड काढत असल्याने, दादारावच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची त्याने कबुली दिली आहे. तर प्रेयसीला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मध्यरात्रीनंतर पटली मृताची ओळख

खून केल्याची माहिती मिळताच सिडको पोलिसांसह गुन्हे शाखा, फॉरेन्सिक लॅब आणि श्वान पथकाने घटनेस्थळी धाव घेतली होती. त्यावेळी त्यांच्या मृतदेहाजवळ सिमेंटचा तुटलेला गट्टू, खिचडीचे पाकीट, रुमाल, मास्क, खिशात दोन नशेच्या गोळ्या, चिल्लर पैसे आणि बाजूला गाठोड्यात एक ड्रेस, रुमाल आढळून आला होता. दरम्यान, मध्यरात्रीनंतर दादाराव यांची ओळख पटली. दादाराव यांचा मुलगा एमजीएम रुग्णालयातील कॅन्टीनमध्ये कामाला असून, त्यांची मुलगी बारावीचे शिक्षण घेत आहे. तर दादाराव हे टेलरिंगचे काम करत होते. त्यांना मद्यपानाचे अती व्यसन होते, अशी माहिती सोनवणे कुटुंबियांनी पोलिसांना दिली होती. दरम्यान, सिडको पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली.

मिसारवाडीतून आरोपी सिडको पोलिसांच्या ताब्यात

अखेर सोमवार ७ जून रोजी मिसारवाडीतून मिस्त्री काम करणाऱ्या सुनील निंभोरेला हत्येच्या प्रकरणात अटक केली आहे. तर त्याच्या प्रेयसीला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे सिडको पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता, उपायुक्त दीपक गिर्हे, सिडको पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक कल्याण शेळके, बाळासाहेब आहेर, सुभाष शेवाळे, नरसिंग पवार, प्रकाश डोंगरे, सुरज भिसे, सुशांत सोनवणे, गणेश नागरे, स्वप्नील रत्नपारखी यांच्या पथकाने केली.

अनैतिकसंबंधासाठी प्रेयसीसोबत छतावर

सुनील निंभोरे आणि त्याची प्रेयसी हे १४ मे पासून शारीरिक संबंध बनवण्यासाठी शहरभरात जागेच्या शोधात होते. पण जागा मिळत नासल्याने २० मे रोजी मध्यरात्री जाधववाडीतील भाजीमंडईतील त्या छतावर दोघेही गेले होते. त्यावेळी मयत दादाराव हा अगोदरच तिथे बसलेला होता. काही अंतरावर सुनील आणि त्याची प्रेयसी जाऊन बसले. काही वेळाने सुनील लघुशंकेसाठी गेला. तेव्हा दादारावने त्या प्रेयसीसोबत छेडछाड सुरू केली. हे सुनील याने पाहिले. त्यामुळे रागाच्या भरात बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू सुनीलने दादारावच्या डोक्यात घातला. असेही आरोपीने पोलिसांना सांगीतले.

हत्या केल्यानंतर दोघेही दुसरीकडे गेले

दादारावच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याची सुनील निंभोरेने हत्या केली. अनैतिक शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी सुनील प्रेयसीला घेऊन छतावर आला होता. मात्र, दादारावमुळे त्यांचा हिरमोड झाला होता. मात्र, धक्कादायक म्हणजे हत्या केल्यानंतर सुनील आणि त्याच्या प्रेयसीने बाजूच्या छतावर जाऊन संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर दोघेही निघून गेले अशी कबुली आरोपीने दिली.

हेही वाचा - पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; चार जण जागीच ठार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.