ETV Bharat / city

Imtiaz Jalil criticizes BJP : विकास करता आला नाही, तर निजाम आठवतो ; इम्तियाज जलील यांची भाजपवर टीका

औरंगाबाद नाही तर संभाजीनगरसाठी तरी रेल्वे बाबत घोषणा करा, अशी टीका खा. इम्तियाज यांनी (Imtiaz Jalil criticizes BJP) केली. रेल्वेबाबत सर्व घोषणा हवेतच केल्या, गेल्या मात्र ठोस उपाययोजना काहीच नाही. असे देखील इम्तियाज जलील यांनी (MP Imtiaz Jalil Marathwada Railway) सांगितलं.

MP Imtiaz Jalil
खासदार इम्तियाज जलील
author img

By

Published : Oct 3, 2022, 1:58 PM IST

औरंगाबाद : औरंगाबाद नाही तर संभाजीनगरसाठी तरी रेल्वे बाबत घोषणा करा, अशी टीका खासदार इम्तियाज यांनी (Imtiaz Jalil criticizes BJP) केली. लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा पक्ष म्हणजे भाजपा. विकास करता येत नाही, तर काहीतरी कारणं देतात. रेल्वेबाबत सर्व घोषणा हवेतच केल्या, मात्र ठोस उपाययोजना काहीच नाही. असे देखील इम्तियाज जलील यांनी (MP Imtiaz Jalil Marathwada Railway) सांगितलं.

प्रतिक्रिया देताना खासदार इम्तियाज जलील

रावसाहेब दानवे यांच्यावर टीका - औरंगाबाद पिट लाईन शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खासदार इम्तियाज जरी हे विरोधी असले, तरी आमचेच वाटतात अशी मिश्कील टीका केली. त्यावर खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. त्यांना काही वाटू द्या, मी आमच्या पक्षाचाच बरा, भाजपमध्ये जाण्याचा पाप कधीही करणार नाही. असं त्यांनी सांगितलं. तर निजामच्या काळातील रेल्वे लाईन आहे. निजामांना रेल्वेची गरज नव्हती त्यामुळे आजपर्यंत विकास झाला नाही, मात्र यापुढे तो होईल. असं वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी सांगितलं. त्यावर जलील यांनी टीका करत यांना विकास करता आला नाही, तर निजाम आठवतो असं वक्तव्य त्यांनी (Jalil criticizes BJP over Marathwada Railway)केलं.

रेल्वे मंत्री खोटं बोलले - औरंगाबाद येथील जाहीर कार्यक्रमात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वे स्टेशनवर हवेत सुविधा उभारणार अस सांगितलं. त्यावर खा. जलील यांनी टीका करत सर्व मंत्री जाहीर कार्यक्रमात खोटे बोलत असल्याची सांगत, आम्ही सहन करणार नाही. मराठवाडा रेल्वेच्या बाबतीत नेहमीच मागास राहिलेला आहे. प्रत्येक वेळेस नवीन प्रकल्प सुरू करत असताना सर्वेक्षण केले जाते. त्यामध्ये केलेल्या गुंतवणूक परतावा मोठ्या प्रमाणात परत येणार नाही, असं कारण देऊन ते प्रकल्प रद्द केले जातात. आम्हाला विकास पाहिजे, रेल्वेमंत्र्यांनी पुढील पन्नास वर्षात असणाऱ्या सुविधा सांगितला. मात्र त्याऐवजी आज काय देणार ? हे त्यांनी सांगितलं नाही. त्यामुळे केलेल्या सर्व घोषणा चुकीच्या असून प्रत्यक्षात काहीही मिळालेले नाही, आम्हाला ठोस उपाययोजना हव्यात, अशी मागणी खासदार यांनी (MP Imtiaz Jalil Marathwada Railway) केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.