औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Rally In Aurangabad ) यांच्या सभेला काही दिवस शिल्लक राहिले असताना अद्याप पोलिसांनी सभेला ( Raj Thackeray Rally Permission ) परवानगी दिली नाही. अस असलं तरी मनसे पदाधिकाऱ्यांनी सभेची जय्यत ( MNS Preparation For Raj Thackeray Rally ) तयारी सुरु केली असून परवानगी मिळाली नाही तरी सभा होणारच, असे संकेत मनसे कडून देण्यात आले आहेत.
मैदानात मनसेचे पूजन - 1 मे रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे संस्कृतिक मैदान येथे जाहीर सभा घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यानंतर राजकीय वातावरण तापले असून त्या सभेला अद्याप परवानगी देण्यात आली नाही. मात्र, मनसे नेत्यांनी आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सभेची जय्यत तयारी सुरु केली आहे. आतापर्यंत दोन ते तीन वेळेस मैदानाची पाहणी करण्यात आली, तर रविवारी मनसे पदाधिकाऱ्यांनी मैदानाचे पूजन करत सभेच्या तयारीचा शुभारंभदेखील केला आहे. त्यामुळे सभेला परवानगी मिळो किंवा न मिळो सभा होणारच, अशी भूमिका मनसेने घेतली आहे.
मनसेकडून पत्रिका वाटप - मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर, राज्य उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाठी यांच्यासह इतर पदाधिकारी गेल्या तीन दिवसांपासून शहरात विविधा भागात राज ठाकरे यांच्या सभेला येण्यासाठी निमंत्रण पत्रिका वाटप करत आहेत. घरा घरात जाऊन, काही मुख्य बाजार पेठांमध्ये निमंत्रण पत्रिका देण्याचे काम करण्यात येत आहे. विशेषतः शिवसेना मतदार असलेल्या भागांमध्ये पत्रिका वाटप करण्याचे काम केले जात आहे.