ETV Bharat / city

Raj Thackeray on loudspeaker : भोंग्यांचा प्रश्न धार्मिक नाही तर सामाजिक - राज ठाकरे

तुम्ही जर भोंगे काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally news ) यांनी जाहीर सभेत केले.

Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad
राज ठाकरे सभा औरंगाबाद
author img

By

Published : May 2, 2022, 8:48 AM IST

Updated : May 2, 2022, 11:54 AM IST

औरंगाबाद - या आधी पण लाऊड स्पीकरवर ( Raj Thackeray on Hanuman Chalisa in Aurangabad ) बोललो, अनेक जन बोलले, मी फक्त पर्याय दिला, तुम्ही जर काढले नाही, तर आम्ही हनुमान चालीसा ( Raj Thackeray on loudspeaker in Aurangabad rally ) मोठ्या आवाजात लावू. मस्जिदबरोबरच मंदिरांवरचे अनधिकृत भोंगे काढू. पण मस्जिदवरचे काढल्यानंतर, असे वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally news ) यांनी जाहीर सभेत केले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे

हेही वाचा - Raj Thackeray : सुप्रिया सुळेंचा दाखल देत राज ठाकरे म्हणाले, 'शरद पवार म्हणजे'..

हा धार्मिक नाही सामाजिक प्रश्न - आम्हाला राज्यात दंगे नको आहेत. मुस्लीम लोकांना पण त्रास होतो. हा धार्मिक विषय नाही, सामाजिक विषय आहे. त्याला धर्म लावला तर आम्ही धर्माने उत्तर देऊ. आम्हाला परिस्थिती खराब करायची नाही, असे राज ठाकरे ( Raj Thackeray Aurangabad rally ) यांनी सांगत, उत्तर प्रदेशात जर भोंगे काढले तर महाराष्ट्रात का नाही. सर्व भोंगे अनधिकृत आहेत, कोणाकडे परवानगी नाही, असा प्रश्न उपस्थित केला. तर तीन तारखेला ईद आहे. आम्हाला ती खराब करायची नाही. मात्र, चार तारखेला ऐकणार नाही. भोंगे बंद झाले नाही तर दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

राष्ट्रवादीमुळे जातीवाद वाढला - माझे आजोबा भट भिक्षूकीच्या विरोधात होते, मात्र आस्तिक होते. पवार त्यांच्या कामापुरते पुस्तक वाचतात. त्यांनी पूर्ण पुस्तक वाचले असते तर कळले असते. पवार यांनी भाषणात कधी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतले का? आता नाटक करत आहेत. नास्तिक आहे म्हणले की त्यांना लागले, आणि पूजा करतानाचे फोटो काढले. तुमचीच मुलगी लोकसभेत म्हणते माझे वडील नास्तिक आहेत. अजून काय पुरावा हवा, असा घणाघात राज ठाकरे यांनी शरद पवार यंच्यावर केला.

शरद पवार यांनी वृद्धापकाळात बाबासाहेब पुरंदरे यांना त्रास दिला. कारण ते ब्राम्हण होते. तुमच्या राजकारणासाठी काहीही करणार का. तुमची सत्ता होती त्यावेळी खेचून आणायचे होते, का नाही आणले? पवार यांना हिंदू शब्दाची अॅलर्जी आहे. ज्यांच्या नावाने राजकारण केले तोच म्हणतो की असे नाही, कशासाठी 15 वर्षे विष पाजले लोकांना. तुम्ही पेरलेले विष शाळे पर्यंत जाऊन पोहचले, अशी टीका राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर केली.

हेही वाचा - Raj Thackeray : शरद पवारांनी जाती-जातीमध्ये भेद निर्माण केले; राज ठाकरेंची बोचरी टीका

Last Updated : May 2, 2022, 11:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.