औरंगाबाद - मनसे कार्यकर्त्यांनी मनपा प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांच्या निवस्थानाचे नळ कनेक्शन रविवारी पहाटे तोडले. शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत असल्याने आयुक्तांचे नळ कनेक्शन तोडल्याचे मनसे कार्यकर्त्यांनी सांगितले.
'पाणी मुबलक का नाही?'
शहराला आठवड्याला पाणी मिळत असल्याने नागरिक त्रस्त आहेत. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शहराला दोन दिवसाआड पाणी मिळेल, असे आश्वासन दिले होते. मात्र हे शक्य नसल्याचे मनपा आयुक्तांनी सांगितले. राज्यातील सर्वाधिक पाणीपट्टी औरंगाबादकरांना द्यावी लागते. मग पाणी मुबलक का नाही? असा प्रश्न मनसेने उपस्थित केला.
मनसेने दिली होती 10 दिवसांची मुदत
पाणी मुबलक मिळावे यासाठी मनसेने आक्रमक भूमिका घेतली होती. पाच जून रोजी पत्रकार परिषद घेत. पाणी पुरवठा मुबलक केला नाही तर आयुक्तांच्या निवासस्थानाचे नळ कनेक्शन तोडू असा इशारा दिला. याबाबत मनपा आयुक्तांनी आपली भूमिका जाहीर न केल्याने आयुक्तांच्या बंगल्याचे नळ कनेक्शन मनसे कार्यकर्त्यांनी तोडले. नागरिकांना पाणी मिळाले नाही तर मनसे तीव्र आंदोलन उभारेल असा इशारा यावेळी आंदोलकांनी दिला.
हेही वाचा - मुंबईत मुसळधार पावसादरम्यान 11 ठिकाणी दुर्घटना, 21 जणांचा मृत्यू