औरंगाबाद- शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट ( MLA Sanjay Shirsat heart attack ) यांना हृदयविकाराचा झटका आला आहे. त्यांना एअर अँब्युलन्सद्वारे मुंबईला हलविले आहे. त्यांच्यावर लिलावती रुग्णालयात उपचार करण्यात ( Mumbai by air ambulance ) येणार आहेत. त्यांच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार आहेत. त्यांच्या प्रकृतीबाबत पुढील माहिती देण्यात येईल, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली
शिंदे गटाचे औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी रात्री त्यांना अचानक त्रास झाल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र सकाळी एअर अँब्युलन्स द्वारे त्यांना मुंबईला हलवण्यात आले. पुढील उपचार लीलावती रुग्णालयात करण्यात येतील, अशी माहिती शिरसाट यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
एकनाथ शिंदे सोबत राहिले खंबीर शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांनी बंड केला. त्यावेळी आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाविरोधात आक्रकम होत साथ दिली. ठाकरे यांच्यावर त्यांनी सुरुवातीला प्रखर टीका केली. पत्र लिहून नाराजीबाबत भाष्य केले. मंत्रिमंडळ विस्तार झाला असताना त्यांना मंत्रिपद न मिळाल्याने ते नाराज असल्याच्या वार्ता दखील समोर आल्या.
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट हे मंत्रीपद न मिळाल्याने नाराज असून ते लवकरच वेगळा विचार MLA ( Sanjay Shirsat not getting ministerial post ) करतील, अशा पद्धतीची चर्चा सुरू होती. संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला अनुपस्थिती दर्शवल्याने या चर्चांना अधिक उधान आले होते. मात्र अशा पद्धतीची कोणतीही नाराजी नसल्याचे संजय शिरसाठ यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना स्पष्ट केले ( MLA Sanjay Shirsat unhappy rumors ) होते.
नाराज असल्याच्या अफवा केवळ प्रसार माध्यमांमधून अफवा मी शिंदे गटासोबत जाताना कोणत्याही मंत्रीपदाचा विचार केला नव्हता. केवळ एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास ठेवून आणि त्यांच्या कामावर विश्वास ठेवून मी त्यांच्यासोबत गेलो, त्यामुळे मला मंत्रीपद मिळाले नाही म्हणून मी नाराज ( MLA Sanjay Shirsat unhappy ) आहे, अशा अफवा केवळ प्रसार माध्यमांमधून पसरवल्या जात आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही, असे शिरसाट यांनी सांगितले होते.
काय म्हणाले होते शिरसाट आजकाल सिनियारिटी काही राहिली नाही राव, अतुल सावे यांच्या वडिलांसोबत राजकारणात होतो. मात्र अतुल सावे आले पहिले राज्यमंत्री आणि नंतर कॅबिनेट मंत्री झाले. जरा आमच्याकडे पण पहा की जरा अशी टोलेबाजी त्यांनी करत आपल्या मनातील दुःख बोलून दाखवले आहे. असे वक्तव्य करुन संजय शिरसाट यांनी शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होते. एकनाथ शिंदे सरकार सत्तारूढ झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रीमंडळाचा पहिला विस्तार झाला. त्यात औरंगाबादेतून संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट Mla Sanjay Shirsat यांचा निश्चित मानले जात होते. मात्र ऐनवेळी शिरसाट यांचा पत्ता कट झाला. तेव्हापासून त्यांनी नाराजी बोलून दाखविली होती.