औरंगाबाद शिक्षक दिनाच्या दिवशी, गावात वास्तव्य करुन काम living in the village करणाऱ्या, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सत्कार Teachers Day will felicitate the teachers करून; कृतज्ञता व्यक्त करावी, असे मत भाजप आमदार प्रशांत बंब Mla Prashant Bamb यांनी व्यक्त केले. काही दिवसांपासून जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या शिक्षकांबाबत बंब यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे, नवे वाद उभे राहीले होते.
शिक्षकांनी मुख्यालयी राहावे शिक्षकांनी नियुक्ती केलेल्या गावात राहून, अध्यापणाच काम करावे, अशी अट असते. मात्र शिक्षक तसे न करता, मुख्य शहरांमध्ये जाऊन वास्तव्य करतात. कामापुरते शाळेत यायचे आणि पुन्हा निघून जायचे, अशी दिनचर्या त्यांची असते. इतकेच नाही तर हे शिक्षक गावात घर भाड्याने घेऊन राहतात, अशी खोटी माहिती शासनाला देऊन घर भाडे देखील उचलतात. असा आरोप प्रशांत बंब यांनी केला. त्यामुळे मी जे काही बोलत आहे. ते योग्यच बोलत आहे, असे वक्तव्य प्रशांत बंब यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन केले. तसेच, शिक्षक दिनाच्या दिवशी, गावात वास्तव्य करुन काम करणाऱ्या, जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांचा सत्कार करून; कृतज्ञता व्यक्त करावी, असेही भाजप आमदार प्रशांत बंब पत्रकार परिषदे दरम्यान म्हणाले. Teachers Day will felicitate the teachers living in the village
काय आहे प्रकरण बंब यांनी मुख्यालयी राहण्याचा मुद्दा विधानसभेत मांडला होता. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात गंगापूर खुलताबादचे आमदार प्रशांत बंब यांनी बुधवारी मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी सर्व शिक्षक, ग्रामसेवक, शासकीय, अधिकारी, कर्मचारी यांचे मुख्यालयी वास्तव्य असणे आवश्यक आहे. असा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता. अनेक शासकीय कर्मचारी अधिकारी व शिक्षक मुख्यालय न राहता, घरभाडी उचलून शासनाची फसवणूक करतात, असेही ते म्हणाले होते. त्यावरून अनेक शिक्षकांनी आमदार प्रशांत बंब यांना फोन करून याविषयी जाब विचारला होता.
हेही वाचा बेस्टच्या खासगी बसवरील कामगारांचा संप