ETV Bharat / city

रखडलेल्या जलकुंभाच्या कामाची मंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी - aurangabad paithan news

गेल्या अनेक वर्षांपासून जुने तहसील व नवनाथ मंदिर जलकुंभाच्या रखडलेल्या कामाची आज राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली. त्याबाबत लवकरात लवकर काम करण्याचे निर्देश पैठण नगरपालिकेला देण्यात आले आहे.

रखडलेल्या जलकुंभाच्या कामाची मंत्री संदीपान भुमरेंकडून पाहणी

author img

By

Published : May 31, 2021, 3:56 PM IST

औरंगाबाद (पैठण) - गेल्या अनेक वर्षांपासून जुने तहसील व नवनाथ मंदिर जलकुंभाच्या रखडलेल्या कामाची आज राज्याचे रोहयो व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी पाहणी केली. त्याबाबत लवकरात लवकर काम करण्याचे निर्देश पैठण नगरपालिकेला देण्यात आले आहे.

'गंभीरपणे दखल घेऊन टाकीची पाहणी'

पैठण शहरातील प्रभाग क्रमांक 11 रंगारहट्टी परिसरातील नवीन पाण्याच्या टाकीच्या संदर्भात संदीपान भुमरे यांनी आज सकाळी या विषयाची गंभीरपणे दखल घेऊन टाकीची पाहणी केली. तसेच येत्या 2-3 दिवसांत जिल्हाधिकारी, जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत जागेचा तिढा सोडवण्यासाठी बैठकीचे आयोजनही केले आहे. पैठण शहराचा वॉटर ग्रीड योजनेत समावेश करण्याची ग्वाही भूमरे यांनी दिली आहे.

पैठण शहराला होणारा अशुद्ध पाणी पुरवठा तसेच गाजीपुरा, रतन बिल्डिंग परिसरात तसेच जोहरीवाडा प्रभागातील पाणी टंचाईचा आढावा घेत नूतन मुख्याधिकारी संतोष आगळे यांना सूचना दिल्या. यावेळी पालिका शिवसेना गटनेते तुषार पाटील, नंदु अन्ना काळे, विजय पापडीवाल, संजय पापडीवाल, नंदू सेठ लाहोटी, अजीम कट्यारे आदी मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा - लग्नानंतर ५ महिन्यातच २४ वर्षीय डॉक्टर तरुणीची आत्महत्या, वडिलांना चिठ्ठी लिहून दिले हे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.