औरंगाबाद - राज्यसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस शतरंज के बादशाद आहेत हे दिसून आले. राज्यसभेत वापरलेली रणानीती आता विधानपरिषद निवडणुकीत ( Legislative Council elections ) वापरली जाणार नाही. यावेळी वेगळी रणनीती वापरणार आहोत. आमचे सगळे उमेदवार निवडून आणणार आहोत, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते रावसाहेब दानवे ( BJP leader Raosaheb Danve ) यांनी केले आहे. शिवाय पंकजा मुंडे यांनी स्वत:चा पक्ष काढावा, असे विधान खासदार इम्तियाज जलील यांनी केले होते. यावर बोलताना पंकजा कोणाच्या सांगण्यावरुन निर्णय घेणार नाही. पक्ष वेळ आल्यावर त्यांना नक्की योग्य संधी देईल, अशी प्रतिक्रियाही रावसाहेब दानवेंनी यावेळी दिली.
'पंकजा जलील यांच्या सांगण्यावरून कुठे जाणार नाहीत' : पंकजा मुंडे यांनी त्यांच्या पक्ष काढावा, असे खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. मात्र त्यांच्या सांगण्यावरून पंकजा असे करतील असे वाटत नाही. त्या भाजपाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. पक्ष वेळ आल्यावर त्यांना नक्की योग्य संधी देईल. त्यांच्यावर अन्याय केला अशी भावना कार्यकर्त्यांची आहे. मात्र वेळ आल्यावर संधी मिळेल, असे स्पष्टीकरण रावसाहेब दानवे यांनी दिले.
'विरोधकांचे उमेदवार पाडणार' : भाजपाचे माजी नेते एकनाथ खडसे यांना उमेदवारी दिल्याने भाजपा विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ देणार नाही, असा आरोप भाजपावर केला जात आहे. राष्ट्रवादीने कोणाला उमेदेवारी द्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यात आम्ही काही बोलणार नाही. आम्ही शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवत आहोत. कोणत्या उमेदवाराविरोधात आम्ही निवडणूक लढवणार नाही. आम्ही आमचे उमेदवार निवडून आणणार त्यांची रणनीती आखली आहे, असे केंद्रीय मंत्री तथा भाजपा नेते रावसाहेब दानवे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - Devendra Fadnavis On Ajit Pawar : अजित पवारांविरोधात षड्यंत्र; देहुतील भाषणावरून फडणवीसांचा गौप्यस्फोट