औरंगाबाद - मराठवाडा मुक्ती दिनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात एमआयएम कार्यकर्त्यांनी गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन केले. उद्धव ठाकरे यांचा ताफा जाणाऱ्या मार्गावर कार्यकर्त्यांनी उपरोधिक आंदोलन करत त्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी केली आणि हातात फलक घेऊन न केलेल्या विकासाबाबत त्यांचे आभार मानले. त्यावेळी पोलिसांनी काही एमआयएम आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात देखील घेतले.
एमआयएमची ठिकठिकाणी गांधीगिरी एमआयएमने दिला होता इशारा-
मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शहरात येणार असल्याने एमआयएम तर्फे खासदार इम्तियाज जलील यांनी गांधीगिरी करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी विमानताळपासून ते सिद्धार्थ उद्यान दरम्यान एमआयएम कार्यकर्त्यांनी जागोजागी हातात फलक घेऊन आंदोलन केले, तर काही ठिकाणी ताफा जाणाऱ्या रस्त्यावर पुष्पवृष्टी देखील करण्यात आली. त्या दरम्यान काही ठिकाणी पोलिसांनी आंदोलक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे.
मराठवाड्यावर अन्याय केल्याने आंदोलन-
आंदोलन करण्याची वेळ शिवसेनेने आणली आहे. मराठवाडा शिवसेनेचा गड मानला जातो. शहराला शिवसेनेने मोठ्या प्रमाणात महापौर दिले. मात्र शहरासह मराठवाड्यात नेमका कोणता विकास केला हे माहीत नाही. तेच विचारण्याचा प्रयत्न आम्ही केला. मराठवाड्याचा किती अनुशेष सेनेने भरून काढला हे त्यांनी सांगावे, ते सांगू शकत नसल्यानेच आम्हाला आंदोलन करावे लागले, त्यातही पोलिसांनी कारवाई केली आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली.
हेही वाचा - मुख्यमंत्री ठाकरे भाजपच्या नेत्यांना म्हणाले, भविष्यातील सहकारी.. त्यावर रावसाहेब दानवेंनी दिली सूचक प्रतिक्रिया
हेही वाचा - Marathwada Muktisangram Day - निजामकालीन १५० शाळांचा पुनर्विकास करणार, मुख्यमंत्र्यांची औरंगाबादमध्ये घोषणा