औरंगाबाद - निजाम काळातील इतिहासाच्या आठवणी जागवणारे क्रांतीचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे अश्वारूढ स्मारकाचे सुशोभिकरणाचे काम अंतिम टप्प्यात असून शिवजयंतीच्या दिवशी सर्वसामान्यांसाठी पर्वणी ठरेल असा विश्वास व्यक्त केला जातोय. हा राज्यातील सर्वात मोठे स्मारक असणार आहे. (Memorial of Monument of Chhatrapati Shivaji Maharaj ) याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी-
चौकात गडकिल्याचे प्रतीक उभं करण्याचा प्रयत्न
छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक सुशोभीकरण करताना अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला आहे. यामध्ये महाराजांच्या स्मारकासोबतच गड-किल्ल्यांचा देखील समावेश केला असल्याने सौंदर्यात भर पडली आहे. याबाबत आखणी करण्यात आल्याचा मत वास्तुविशारद धीरज देशमुख यांनी व्यक्त केला. (Statue Of Chhatrapati history at Kranti Chowk) औरंगाबाद शहराला ऐतिहासिक अशी असा वारसा आहे. त्यामुळे विशेष आणि गड-किल्ल्यांचा समावेश असणारा देखावा निर्माण व्हावा यासाठी प्रयत्न केले गेले. त्यातूनच देवगिरी किल्ल्यासारखा किंवा त्याच्यासारखा दिसणारा असा आराखडा तयार करून पुतळ्याचा सुशोभीकरण करण्यात आल्याचे धीरज देशमुख यांनी सांगितले.
देवगिरी केल्यासारखे असणार वाहतूक बेट
क्रांती चौक येते शिवाजी महाराजांचे स्मारक पूर्वीपासूनच होते. (Chhatrapati Shivaji Maharaj In Aurangabad) मात्र, त्याची उंची वाढवण्याचे काम करण्यात आले. त्या सोबतच वाहतूक बेट आणि शिवाजी महाराजांचे स्मारक याचे सुशोभीकरण करण्यासाठी विशेष डिझाईन तयार करण्यात आले. ज्यामध्ये वाहतूक बेट ऐतिहासिक वाटणार आहे. त्यामध्ये देवगिरी किल्ल्याचा सारखा देखावा तयार करण्यात येत आहे. त्याला बाहेरून तटबंदी, त्यामागे पाणी, दगडी भिंती, महाल, तोफ, कमान यांचा वापर करण्यात आला आहे. इतकेच नाही तर कमानीमध्ये जवळपास 24 मावळे हे असणार आहेत.
दोन बाजुंनी शौर्याचे प्रतीक
महाराजांच्या स्मारकाच्या खालच्या बाजूला चारही बाजुंनी राजमुद्रा लावण्यात येणार आहेत. त्यासोबर दोन बाजुंनी शौर्याचे प्रतीक दाखवणारे सिंह लावण्यात येणार आहेत. त्याखाली चारी बाजूंनी हत्तीच्या सोंडी मधून पाणी पडताना दाखवण्यात येणार आहे. ज्यामुळे चौक आकर्षक आणि सुंदर दिसेल अशी रचना असेल असे मत वास्तुविशारद धीरज देशमुख यांनी व्यक्त केल.
राज्यातील सर्वात मोठे स्मारक
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा चौथरा देखील विशेष असणार आहे. या चौथऱ्याची उंची 35 फूट इतकी असणार आहे. जवळपास चौकामध्ये चोवीस मिटर इतक्या आकारात वाहतूक बेटाचे सुशोभीकरण केले गेले आहे. तर, यामध्ये तीन थर असतील. ही जागा वीस बाय दहा फूट इतकी असणार आहे. ती जागा 10 फूट रुंद तर 20 लांबी असणार आहे.
स्मारकाची उंची 21 फूट इतकी आहे
स्मारक मोठे असून घोडा चौथर्याच्या थोडा बाहेर येणार असला तरी तो आकर्षक वाटणार आहे. स्मारकाची उंची 21 फूट इतकी उंच असून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येकाला हे स्मारक दुरूनच आकर्षून घेईल, शिवजांतील सर्व सामान्यांना अभिवादनासाठी खुले करण्याचा प्रयत्न आहे असा विश्वास धीरज देशमुख यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Income Tax On PMC : पुणेकरांसाठी खुशखबर! मिळकत कर अन् करमणूक करात वाढ होणार नाही