औरंगाबाद - प्रचंड इच्छा शक्ती ( Mansi Sonawane pass UPSC exam ) आणि अभ्यासाचे नियोजन यामुळे यश मिळू शकते, अशी भावना यूपीएससी ( UPSC ) परीक्षा उत्तीर्ण झालेल्या मानसी सोनवणे हिने व्यक्त केली. सोमवारी लागलेल्या ( Mansi Sonawane upsc Aurangabad news ) निकालात मानसीचा 624 वा रँक आला. तिचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.
आई वडिलांनी वाढवला विश्वास - 24 वर्षीय मानसीने पहिल्या प्रयत्नात मुख्य परीक्षा पास केली. याआधी तिने दोनदा पात्रता परीक्षा दिली होती. मात्र, यश मिळू शकले नाही. त्यावेळी मन खचले होते. आता स्वप्न सोडावे लागेल, असे वाटत असताना आई वडिलांनी विश्वास दिला. तू हे करू शकतेस, असा आत्मविश्वास वडिलांनी मानसीला दिला आणि तिने जिद्दीने अभ्यासाला सुरुवात केली. नियोजन बद्ध अभ्यास करत, मर्यादित मित्रांची आणि नातेवाईकांशी संपर्क ठेवून नैराश्य कमी करण्याचा प्रयत्न केला आणि यश प्राप्त केले, अशी प्रतिक्रिया मानसी सोनवणे हिने दिली.
अभ्यासाचे केले नियोजन - मानसीने रोज जास्त वेळ अभ्यास करण्यापेक्षा नियोजन बद्ध अभ्यास केला. सकाळी उठल्यावर पाहिले वर्तमानपत्र वाचून दिवसाला सुरुवात करायची आणि त्यानंतर सकाळी आठ ते दुपारी दोन पर्यंत अभ्यास, थोडा आराम रात्री पुन्हा अभ्यास असे नियोजन केले. महाविद्यालयात असल्यापासून यूपीएससी करायची अशी इच्छा असल्याने तेव्हापासून नियोजन केले. रोजच नवीन काहीतरी येते आणि आपण केलेला अभ्यास योग्य आहे का? असा प्रश्न पडतो. मात्र आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा म्हणजे यश मिळेल, असा कानमंत्र मानसीने विद्यार्थ्यांना दिला.
वडिलांचे स्वप्न केले पूर्ण - मानसीचे वडील नरेंद्र लेखापाल आहेत. घरची परिस्थिती बेताची आणि मार्गदर्शन नसल्याने नरेंद्र सोनवणे यांना UPSC परीक्षा पास करता आली नाही. त्यावेळी परीक्षा काय असते हे देखील कळले नाही आणि समज येई पर्यंत वयोमर्यादा ओलांडली. मात्र, आपले स्वप्न मुलगी पूर्ण करेल, असा विश्वास होता. त्यामुळे, तिचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न केले. ती खचू नये म्हणून प्रयत्न केले, त्यामुळे आज यश मिळाले. मात्र मनासारखा रँक मिळाला नाही. मानसी आणखी पुढे जाईल, असा विश्वास मानसीचे वडील नरेंद्र सोनवणे यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - Chandrakant Khaire : भाजपने एमआयएम, वंचितला 1 हजार कोटींची मदत केली, चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप