औरंगाबाद - देशात 'सीएए'सारखा इतका मोठा कायदा आणला आहे. तसाच मशिदीवरून भोंगे काढण्यासाठी देखील कायदा आणा, असे आव्हान इम्तियाज जलील यांनी दिले. 'राज ठाकरे इतके वर्ष काय करत होते? त्यांना आत्ताच मशिदीचे भोंगे कसे आठवले, असा प्रश्न एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार इम्तियाज जलील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केला.
हेही वाचा... आमचे अंतरंग भगवेच..! मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला
गुरुवारी राज ठाकरे यांनी आपल्या पक्षाचा नवा झेंडा आणि अजेंडा, पक्षाच्या राज्यव्यापी महाअधिवेशनात मांडला. त्यावेळी राज ठाकरे आता मनसेला हिंदुत्वाच्या मार्गावर घेऊन जातील असे दिसत आहे. यावेळी त्यांनी केलेल्या जाहीर भाषणात, मशिदीवरील भोंगे बंद करण्याबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या विधानाबाबत खासदार इम्तियाज जलील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
हेही वाचा.... गेल्या वर्षभरात देशात गोंधळ अन् गडबड, केंद्र सरकार मान्य करणार का वस्तुस्थिती?
सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा आणला आहे. मुस्लीम समाजाच्या लोकांनी येथे रहायचे की नाही, असे वातावरण निर्माण केले आहे. तसेच मशिदीवरून भोंगे काढण्यासाठीही कायदा आणा, असे जलील यांनी म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे हे 'लाव रे तो व्हिडिओ' असा प्रचार करत, अमित शाह आणि नरेंद्र मोदी विरुद्ध बोलत होते. मात्र, मागील दोन तीन महिन्यात नेमके काय झाले माहीत नाही.
राज ठाकरे यांना मशिदीवरील भोंगे काढावे, असे वाटत असेल. तर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे जात सरकारकडून भोंगे काढण्यासाठी बिल आणावे, असे जलील यांनी म्हटले आहे.