ETV Bharat / city

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज भक्त परिवाराकडून हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठींबा

जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, पक्षातील मतभेदांमुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष म्हणून उभे राहिले आहेत.

हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठींबा
author img

By

Published : Apr 12, 2019, 11:01 AM IST

औरंगाबाद - महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज भक्त परिवाराने वेरूळ येथील आश्रमात पत्रकार परिषद घेत शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभा उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला. बाबाजींचा पाठिंबा खूप महत्त्वाचा आहे. या पाठिंब्यामुळे माझा विजय निश्चित झाला आहे, असे मत हर्षवर्धन जाधव यांनी व्यक्त केले.

हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठींबा देताना शांतिगिरी महाराज भक्त परिवार

जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र, पक्षातील मतभेदांमुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष म्हणून उभे राहिले. अपक्ष म्हणून निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल, अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी घेतली होती. या भूमिकेला पाठिंबा म्हणून शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभा राहिला आहे, असे भक्त परिवाराने जाहीर केले.

बाबाजी भक्तपरिवार गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभा होता. बाबांचे लाखो भक्त हे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी काम करत होते. मात्र २० वर्षानंतर एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्या पर्यायाला आम्ही पाठिंबा देवू. किमान १ लाख भक्त परिवाराचे मते आम्ही हर्षवर्धन जाधव यांना देवू, असा विश्वास भक्त परिवारातर्फे व्यक्त करण्यात आला.

महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणूक लढवतील, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही, असे शांतिगिरी महाराज यांनी स्पष्ट केले होते. आपण कोणाला पाठिंबा देणार याबाबत भक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेवू, असे त्यांनी सांगितले होते. त्यानुसार भक्त परिवाराने चर्चा करून शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला.

Intro:महामंडलेश्वर शांतिगिरी महाराजांच्या भक्त परिवाराने शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे लोकसभा उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला.

Body:शांतिगिरी महाराज भक्त परिवारातर्फे वेरूळ येथील आश्रमात पत्रकार परिषद घेत हर्षवर्धन जाधव यांना जाहीर पाठिंबा जाहीर केला.

Conclusion:महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज लोकसभा निवडणुका होतील अशी शक्यता वर्तवली जात होती, मात्र आपण कोणतीही निवडणूक लढवणार नाही अशी भूमिका शांतिगिरी महाराज यांनी स्पष्ट केल. मात्र आपण कोणाला पाठिंबा देणार याबाबत भक्तांसोबत चर्चा करून निर्णय घेऊ असे देखील शांतीगिरी महाराजांनी सांगितले होत. त्यानुसार फक्त परिवाराने चर्चा करून शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना आपला पाठिंबा जाहीर केला. औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्याचे हर्षवर्धन जाधव हे शिवसेनेचे आमदार आहेत. मात्र पक्षातील मतभेदांमुळे त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत अपक्ष उमेदवारी जाहीर केली. अपक्ष उमेदवार म्हणून जरी निवडणूक लढत असला तरी निवडून आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर पाठिंबा देईल अशी भूमिका हर्षवर्धन जाधव यांनी घेतली होती. या भूमिकेला पाठिंबा म्हणून शांतिगिरी महाराजांचा भक्त परिवार हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी उभा राहिला आहे अस जय बाबाजी भक्त परिवाराने जाहीर केलं. बाबाजी भक्तपरिवार गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्या पाठीशी उभा होता, बाबांचे लाखो भक्त हे चंद्रकांत खैरे यांच्यासाठी काम करत होते. मात्र वीस वर्षानंतर एक नवा पर्याय उपलब्ध झाला असून त्या पर्यायाला आम्ही पाठिंबा देऊ आणि किमान एक लाख मत भक्त परिवाराचे आम्ही हर्षवर्धन जाधव यांच्या पाठीशी असा विश्वास भक्त परिवारातर्फे देण्यात आला. बाबाजीचा पाठिंबा खूप महत्त्वाचा असून या पाठिंब्यामुळे माझा विजय हा निश्चित झाल्याचे मत हर्षवर्धन जाधव यांनी यावेळी व्यक्त केलं. बाबाजी भक्त परिवाराचे राजेंद्र पवार आणि हर्षवर्धन जाधव यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.