ETV Bharat / city

कोरोनामुळे मानसिक आजारांमध्ये वाढ, वेळेत उपचार घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला - मानसिक आजार बातमी

आवश्यक चिंता केल्याने धडधड होणे, मळमळ होणे, आजारी असल्याचा भास होणे असे प्रकार जाणवतात. त्यामुळे यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजारांची तीव्रता वाढल्यास याचे परिणाम आरोग्यावर जाणवू शकतात, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मीन आचलिया यांनी व्यक्त केली.

Psychiatrist Dr. Rashmin Achalia
मानसोपचार तज्ज्ञ डॉ रश्मीन आचलीया
author img

By

Published : Oct 19, 2020, 9:07 PM IST

Updated : Oct 19, 2020, 10:45 PM IST

औरंगाबाद - कोरोनामुळे अनेकांची आर्थिक स्थिती बिघडली आहे. त्यामुळे येणाऱ्या अडचणी अनंत असताना माणसाच्या मानसिक आजारात भर पडल्याचं समोर आलं आहे. माणसाला असणाऱ्या चिंतेच्या आजारात वाढ होत असून, लवकरात लवकर उपचार घेण्याची गरज असल्याचा सल्ला मानसोपचार तज्ज्ञ डॉ रश्मीन आचलीया यांनी दिला आहे.

मानसोपचार तज्ज्ञ डॉ रश्मीन आचलीया

हेही वाचा - मानसिक आरोग्याच्या समस्येत वाढ; मानसोपचार तज्ज्ञ म्हणतात...

कोरोनामुळे मानसिक आजार वाढले आहेत. यामध्ये स्वतःच्या प्रकृतीविषयी जास्त चिंता व्यक्तीला वाटते. आवश्यक चिंता केल्याने धडधड होणे, मळमळ होणे, आजारी असल्याचा भास होणे असे प्रकार जाणवतात. त्यामुळे यावर तातडीने उपचार करणे गरजेचे आहे, अन्यथा आजारांची तीव्रता वाढल्यास याचे परिणाम आरोग्यावर जाणवू शकतात, अशी भीती मानसोपचार तज्ज्ञ डॉ. रश्मीन आचलिया यांनी व्यक्त केली.

कोरोनामुळे माणूस आपल्या प्रकृतीची काळजी घेऊ लागला आहे. मात्र, ही काजळी घेताना तो अतिकाळजी घेत असल्याचे काही दिवसांमध्ये दिसून आले असल्याचे मत डॉ. आचलिया यांनी व्यक्त केले. कोरोना होईल या भीतीने पॅनिक डिसऑर्डर म्हणजेच घाबरून अत्यवस्थ होत आहेत. या प्रकारात मळमळ होणे, धडधड होणे, चक्कर येणे असे अनुभव होतात. अशावेळी शरीराचं तापमान वाढते. त्यामुळे ताप आल्याचे जाणवते. अशावेळी अनेकजण डॉक्टरांकडे जाऊन आरोग्य तपासणी करून घेतात. मात्र, त्यात काही निष्पन्न होत नाही. दुसरा एक प्रकार आहे ज्याला ऑक्ससेसिव्ह कंपलसीवनेस म्हणतात. यामध्ये एखादी गोष्ट करण्यासाठी वेडं होऊन ती अनिवार्य असल्याचा भास होत ती गोष्ट सतत करत राहतात. आपल्या मेंदूत दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकारात एखादी कृती सुरू होऊन ती संपल्याचे सांगते. तर दुसऱ्या प्रकारात मेंदू आपली कृती झाल्याचं सांगूनही ती आपल्याला कळत नाही. त्यामुळे साबणाच्या जाहिरातीत हात धुण्याचा सल्ला दिला जातो तो सल्ला पाहून काळजीपोटी सतत हात धुण्यास सुरुवात करतो. मात्र, काही सेकंद हात धुण्याऐवजी चार, पाच मिनिटं हात धुतात. त्यांचं त्यांच्या क्रियेवर नियंत्रण राहत आहे. स्वतःच्या प्रकृतीविषयी अतिचिंता माणूस करत आहे. त्यामुळे चिंतेचे आजार जडत असल्याच्या तक्रारी वाढत चालल्या आहेत.

त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर आणि मानसिक स्वास्थावर पडत आहेत. त्यामुळे अतिचिंता करण्यापेक्षा तातडीने वैद्यकीय सल्ला घेऊन उपचार करणे महत्वाचे झाले आहे. वेळेवर उपचार घेतले नाही तर यासवयी घातक असल्याची भीती डॉ. रश्मीन आचलिया यांनी व्यक्त केली.

सॅनिटायझरचा अति वापर मुलांसाठी घातक-

कोरोनाचा आजार सुरू झाल्यापासून हात स्वच्छ ठेवण्याचा सल्ला वेळोवेळी दिला जात आहे. त्यात लहान मुलांचे हात सतत धुतले जात आहेत. त्याचबरोबर सॅनिटायझरचा वापर वाढला आहे. मात्र, सॅनिटायझरच्या अतिवापरामुळे लहान मुलांचे पोट दुखीचे प्रकार वाढले असल्याच्या तक्रारीत भर पडत असल्याचे डॉ रश्मीन आचलिया यांनी सांगितलं.

Last Updated : Oct 19, 2020, 10:45 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.