औरंगाबाद - शिक्षण विभागात संशोधन करणाऱ्या विद्यार्थिनीला विभाग प्रमुखानेच ५० हजार रुपये मगितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षण विभागात समोर आला आहे. या प्रकरणी बुधवारी (दि. 30 मार्च)रोजी विद्यार्थिनीने बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. (Professor Demanded a Bribe from the Student) अंजली घनबहादूर (रा. जयसिंगपूरा) असे तक्रारदार विद्यार्थिनींचे नाव आहे.
बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार - अंजली या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील शिक्षण विभागात संशोधन करीत आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभाग प्रमुख उज्वला भडांगे या अंजली यांच्याकडे वारंवार 50 हजार रुपयांची मागणी करीत होत्या. त्यांच्या मागणी कडे अंजली यांनी दुर्लक्ष केल्यामुळे भडांगे यांनी त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. (In Bamu, a student was asked for a bribe) शेवटी या त्रासाला कंटाळून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. मात्र, प्रशासनाने कोणतेही कारवाई केली नाही. त्यामुळे अंजली यांनी येथील बेगमपुरा पोलीस ठाण्यात विभाग प्रमुख भडांगे यांच्या विरोधात तक्रार दिली.
माझे गाईड पैशे मागत नाही मग या कशाला मागतात - संशोधक अंजली या म्हणाल्या की माझे गाईड यांनी माझ्याकडे कधीही पैशाची मागणी केली नाही. मात्र, गेल्या अनेक दिवसांपासून विभाग प्रमुख भडांगे या 50 हजार रुपयांची मागणी करीत आहेत. मी वारंवार त्यांच्या या माणीकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यांनी मला त्रास द्यायला सुरूवात केली. शेवटी मी या त्रासाला कंटाळून रीतसर पोलिसांत तक्रार दिली. दरम्यान, मला न्याय मिळाला नाही, तर मी आंदोलनाचा मार्ग अवलंबेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा - Salman Khan Neighbor Case : सलमानचा शेजाऱ्याविरोधातील मानहानीचा दावा कोर्टाने फेटाळला