औरंगाबाद - राज्यात लॉकडाऊन सध्या नाहीच, या बाबत कुणीच अफवा पसरवू नये, भीतीही दाखवू नये, असे राजेश टोपे यांनी सांगितले. 700 मेट्रिक टनपेक्षा जास्त ऑक्सिजन लागले की, आपोआप लॉकडाऊन लागेल, असेही टोपे ( Health Minister Rajesh Tope talk on omicron ) यांनी सांगितले.
ओमायक्रॉनचा संसर्ग वेगाने पसरत आहे, हे खरे आहे. निर्बंध सध्या लावले आहेत ते वाढवावे लागतील, याबाबत बैठक झाली आहे, आणि पुढच्या आठवड्यात बैठक होणार आहे, असे टोपे यांनी सांगितले.
बेड आणि ऑक्सिजन उपलब्धतेवर पुढचे निर्णय अवलंबून
मुंबईत काल काही ठिकाणी निर्बंधांचे उल्लंघन झाले आहे. काल पहिला दिवस होता, मात्र नियम कसोशीने पाळावे लागतील आणि ते पाळून घेणे सुद्धा राज्य सरकरला आव्हान आहे, असे टोपे म्हणाले. सध्या डेल्टाचे रुग्ण ओळखने आणि ओमायक्रॉनवर आम्ही काम करत आहे, संख्या वाढत आहे, हे खरे आहे. बेड आणि ऑक्सिजन उपलब्धता यावर पुढचे निर्णय अवलंबून असतील, असे टोपे म्हणाले.
निर्बंध पहिले पाऊल
टेस्टिंग सगळीकडे करत आहे. मुंबईत विकली पीसीटीव्ही रेट 5 टक्क्यांवर गेला आहे आणि दिवसाचा 10 टक्क्यांवर गेला आहे. मेट्रो सिटीमध्ये खासकरून मुंबई, ठाणे, पुणे नाशिक येथे जास्त पोझिटिव्हिटी रेट आहे. लॉकडाऊनचा अजिबात विषय नाही. मात्र, निर्बंध वाढवणार. लॉकडाऊनचा परिणाम अर्थकरणावर होतो. पहिल्या दुसऱ्या लाटेमध्ये आपण हे पाहिले. जान है तो जहान है मान्य, कठोर निर्णय घेऊच, मात्र निर्बंध पाहिले पाऊल आहे. एक नक्की, आज आपण एक टप्पा निर्बंध लावले आहेत, पुढे कठोर कारवाई करू. सिनेमा हॉल, हॉटेल्स, स्कूल कॉलेजेस यांच्यावर अजून निर्णय नाही, मात्र पुढे निर्बंध लागू शकतात, सध्या लसीकरणाबाबत विचार सुरू आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली.
हेही वाचा - Bharati Pawar on Corona regulation : कोरोना निर्बंधांचे निर्णय राज्यांनी घ्यावेत - भारती पवार