ETV Bharat / city

Hanuman Chalisa MNS Aurangabad : औरंगाबादमध्ये मनसेकडून हनुमान चालीसा पठण - मनसे हनुमान चालीसा प्रकरण

मनसेकडून हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालीसा पठण सोबतच जवळपास तीन हजार हनुमान चालीसा वाटप या निमित्ताने केल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेडकर यांनी दिली. हनुमान चालीसा पठण करण्याआधी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आल्याने राज्य सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

चालीसा पठण करताना मनसे पदाधिकारी
चालीसा पठण करताना मनसे पदाधिकारी
author img

By

Published : Apr 17, 2022, 9:06 PM IST

Updated : Apr 17, 2022, 9:33 PM IST

औरंगाबाद - मनसेतर्फे हनुमान जयंती निमित्त औरंगपुरा येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे हनुमान चालीसा पठण करण्यात आले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मस्जिदवरील भोंगे लावण्यावरून टीका करत भोंगा लावून हनुमान चालीसा लावा, असे आदेश कार्यकर्त्यांना दिले होते. त्यावर मनसे पदाधिकाऱ्यांनी हनुमान जयंतीच्या मुहूर्तावर हनुमान चालीसा पठण केले.

आढावा घेताना प्रतिनिधी

हनुमान चालीसा वाटप : हनुमान जयंतीच्या निमित्ताने हनुमान चालीसा पठण सोबतच जवळपास तीन हजार हनुमान चालीसा वाटप या निमित्ताने केल्याची माहिती मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेडकर यांनी दिली. हनुमान चालीसा पठण करण्याआधी मनसे पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस बजावण्यात आल्याने राज्य सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे.

मनसेकडून भाजपाला हनुमान चालीसा भेट : मनसे तर्फे औरंगपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान चालिसाच्या तीन हजार प्रती वाटण्यात आल्या. त्यावेळी भाजपा पदाधिकारी मंदिरात आले. दर्शन घेऊन परत जात असताना मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी भाजपाचे अतुल सावे यांची भेट घेत हनुमान चालीसा भेट दिली. भाजपा पदाधिकऱ्यांनी हसतमुखाने हनुमान चालीसा प्रती स्वीकारल्या आणि प्रतिमधून हनुमान चालीसा पठण केले. त्यामुळे नव्या समीकरणाच्या चर्चेला उधाण आले.

एकाच मंदिरात हनुमान चालीसा पठण : औरंगपुरा येथील दक्षिण मुखी हनुमान मंदिरात मनसेच्या वतीने सकाळी 10 च्या सुमारास हनुमान चालीसा पठन करण्यात आले. लाऊड स्पीकर लावून हे पठण करण्यात आले. त्याच ठिकाणी सकाळी 11 वाजता भाजपा पदाधिकाऱ्यांनी अतुल सावे, जिल्हाध्यक्ष संजय केणेकर यांच्यासह हनुमान चालिसा पठण केले. दरवर्षी भाजपा सुपारी हनुमान मंदिरात पूजन केले जाते. मात्र यावर्षी मनसे पाठोपाठ दक्षिण मुखी हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठन केल्याने चर्चा तर होणारच, अस म्हणता येईल.

हेही वाचा - Ajit Pawar in Baramati : अरे बाबांनो, देशासमोर असणाऱ्या प्रश्नांना महत्त्व द्या; अजितदादांचे आवाहन

Last Updated : Apr 17, 2022, 9:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.