औरंगाबाद - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्याचे कार्यकर्त्यांना आदेश दिले. त्यामुळे सामाजिक वातावरण खराब होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली. मात्र त्यांना औरंगाबादच्या हिंदू मुस्लिम बांधवानी ( Aarti by Hindu and Muslim brothers ) एकोप्याचे दर्शन घडवत उत्तर दिले आहे. औरंगाबाद संवेदनशील शहर असून कोठलीही अपरिहार्य घटना होऊ नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज झाली असताना चेलिपुरा येथे गणपती मंदिरात ( Hindu Muslim Aarti at Ganapati Temple at Chelipura ) हिंदू मुस्लिम बांधवानी एकत्र आरती करत राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांना उत्तर दिले आहे.
व्यापाऱ्यांनी केली आरती : चेलिपुरा भागात हिंदू मुस्लिम व्यापाऱ्यांनी एकत्र येत गणपती मंदिरात शांततेसाठी आरती केली. आधीच व्यापारी व्यवसाय नसल्याने अडचणीत आला आहे. त्यात अशांतता पसरली तर पुन्हा नुकसान होते आणि आम्हाला या राजकारण बाबत काहीही करायचे नाही. आम्ही हिंदू मुस्लिम येथे एकत्र काम करतो, अस व्यापारी म्हणाले. म्हणूनच ही शांततेची ऐक्याची आरती करण्यात आली, असे व्यापाऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा - Raj Thackeray PC Video : 'आम्हाला शांतता बिघडावयची नाही, जर हे भडकावायचे असते तर औरंगाबादेत...'