ETV Bharat / city

Vaccination at Petrol Pumps : पहिल्यांदाच 'अशा' पद्धतीने लसीकरण, औरंगाबादकरांचा मिळतोय चांगला प्रतिसाद! - नो लस नो पेट्रोल

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Collector Sunil Chavan decision on corona vaccination ) यांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तीन पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून क्रांतीचौक, उल्कानगरी आणि दिल्लीगेट या तीन ठिकाणच्या पेट्रोल पंपावर लसीकरण सुरू झाल्याची माहिती पेट्रोल पंप चालक असोसिएशन सचिव अखिल अब्बास ( Aurangabad Petrol Pup owner association ) यांनी दिली.

औरंगाबाद पेट्रोल पंप लसीकरण
औरंगाबाद पेट्रोल पंप लसीकरण
author img

By

Published : Nov 26, 2021, 7:43 PM IST

Updated : Nov 26, 2021, 8:06 PM IST

औरंगाबाद - लसीकरणात राज्यात पिछाडीवर असलेल्या औरंगाबाद शहरात पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू करण्याचा हा पायलेट प्रोजेक्ट आहे. पहिल्या दिवशी तीन पेट्रोल पंपांवर लसीकरण केंद्र उभारण्यात आले. त्याला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे.

लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेगवेगळे उपाय केले जात आहेत. नागरिकांनी लसीकरण केंद्रापर्यंत यावे यासाठी विविध उपाययोजना जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केल्या ( Aurangabad collector Sunil Chavan efforts on vaccination ) आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नो लस नो पेट्रोल ही संकल्पना राबवण्यात आली होती. मात्र, या संकल्पनेत पेट्रोल पंप चालकांना अनेक अडचणींना सामना करावा लागत होता. मनुष्यबळ जास्त लागणार असल्याने गुरुवारी सकाळी आठ ते संध्याकाळी सात या कालावधीत पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. पेट्रोल पंप चालकांच्या गांधीगिरी आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली होती. त्यात पंप चालकांनी पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू करावे, अशी विनंती केली.

शहरातील तीन पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू

हेही वाचा-मुलांचे लसीकरण होऊन शाळा सुरू करणे अपेक्षित होते - पालक संघटना

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण ( Collector Sunil Chavan decision on corona vaccination ) यांनी प्रायोगिक तत्त्वावर शहरातील तीन पेट्रोल पंपावर लसीकरण केंद्र सुरू केले. त्यानुसार शुक्रवारी सकाळपासून क्रांतीचौक, उल्कानगरी आणि दिल्लीगेट या तीन ठिकाणच्या पेट्रोल पंपावर लसीकरण ( Vaccination at petrol Pumps in Aurangabad) सुरू झाल्याची माहिती पेट्रोल पंप चालक असोसिएशन सचिव अखिल अब्बास ( Aurangabad Petrol Pup owner association ) यांनी दिली.

हेही वाचा-Vaccination In Baramati : बारामतीत आता १०० टक्के लसीकरणासाठी 'हर घर दस्तक' अभियान

पहिल्याच दिवशी कोलमडले नियोजन
शुक्रवारी सकाळी पहिल्यांदाच पेट्रोल पंपावर लसीकरण करण्याला सुरुवात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयानंतर प्रत्यक्षात लसीकरण सुरू करताना नियोजन बिघडल्याचा पाहायला मिळाले. पेट्रोल भरायला आलेल्या व प्रमाणपत्र नसलेल्या नागरिकांना लसीकरण करून घेण्यासाठी थांबविण्यात आले. महानगरपालिकेच्यावतीने लावण्यात आलेल्या केंद्रात कर्मचार्‍यांचा अभाव असल्याने जवळपास दोन तास ग्राहकांना लस आणि पेट्रोल दोन्ही घेण्यासाठी विलंब झाला. काही नागरिकांनी थांबवून लस घेतली तर काहीजण वेळेअभावी तिथून निघून गेले. यापुढच्या काळात तरी नियोजन चांगले असावे, अशी अपेक्षा नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा-औरंगाबाद : लसीकरण वाढवण्यासाठी प्रशासनाने कसली कंबर; एकही डोस न घेतलेल्या रिक्षा चालकांच्या रिक्षा जप्त होणार

औरंगाबाद जिल्हा लसीकरणात 26 व्या क्रमांकावर असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून जोरदार प्रयत्न

बाबा पेट्रोल पंप ( Baba petrol pump aurangabad) येथे ग्राहकांनी लस घेतल्याची खात्री न करता पेट्रोल देत नियमांचे उल्लंघन केले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांच्या आदेशाने रविवार (दि.२१) रात्री हा पेट्रोल पंप सील करण्यात आला होता. राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरणाला अल्प प्रतिसाद आहे. यामुळे जिल्हा 26 व्या क्रमांकवर आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशी ऑनलाईन संवाद साधत लसीकरण कमी असल्याने चिंता व्यक्त करत लसीकरण वेग वाढवण्याच्या सूचना केल्या होत्या. यामुळे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी नवी नियमावली तयार केली.

Last Updated : Nov 26, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.