ETV Bharat / city

Nevasa Police Station: नेवासा तहसिलदार यांच्या बंगल्याजवळ गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार

नेवासा तालुक्याचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी असलेल्या नेवासा तहसिलदार यांच्या बंगल्याजवळ (Desi Pistol) गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्या गेला. एका जणाचा काटा काढण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. नेवासा पोलीसांनी (Nevasa Police Station) विविध कलमांर्गत गुन्हेगारां विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

author img

By

Published : Jul 17, 2022, 5:28 PM IST

Nevasa Police Station
नेवासा पोलीस स्टेशन

अहमदनगर: नेवासा तालुक्याचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी असलेल्या नेवासा तहसिलदार यांच्या बंगल्याजवळ (Desi Pistol) गावठी कट्ट्यातून हवेत गोळीबार केल्या गेला. एका जणाचा काटा काढण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. ही घटना संभाजीनगर येथील ओमसाई टायर्स वर्क्स येथे सांयकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली. घटनेने परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. तहसिलदार बंगल्याच्या हाकेच्या अंतरावर ही घटना घडल्यामुळे गुन्हेगारांवर पोलिसांचा, कायद्याचा धाक नसल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा उघड झाले. तर पोलिसांच्या कर्तबगारीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. तर नेवासा पोलीसांनी (Nevasa Police Station) विविध कलमांर्गत गुन्हेगारां विरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

संभाजीनगर प्रभागासमोर असलेल्या सेंट मेरीज् स्कुलच्या प्रवेशव्दार जवळ आकाश पोपट कुसळकर (वय २०) रा.संभाजीनगर. या युवकाचे ओमसाई टायर्स वर्क्स हे दुकान हे. या दुकाणात आकाश कुसळकर बसलेला असतांना, त्याचा मिञ अमोल भास्कर शेलार हा साडेसात वाजेच्या सुमारास तेथे आला. त्याने त्याची स्कुटी गाडी त्याने सर्व्हिस सेंटरवर धुण्यासाठी आणली होती. हे दोघे जण गप्पा मारत असतांना काही वेळातच त्याच्या पाठीमागून या गोळीबारातील आरोपी अनिल चव्हाण,मयुर वाघ,ज्ञानेश्वर दहातोंडे व त्याच्या सोबत एक आणखी अनोळखी इसम असे चौघे आले.

या चौघांपैकी मयुर वाघ याच्या पाठीमागे बसलेला अनिल चव्हाण हा खाली उतरला. त्यावेळी त्याच्या हातामध्ये बियरची बटल होती.तो अमोल शेलार याच्याकडे बघुन त्याला म्हणायला लागला की, "तु लय माजलास,तुझा आज काटाच काढतो ? व त्याला शिवीगाळ करू लागला. त्यावेळी दुकाण चालक आकाश कुसळकर त्यांना म्हणाला की,येथे शिवीगाळ करु नका. त्यावेळी आरोपी अनिल चव्हाण याने त्याच्या हातातील बियरची बाटली आकाश कुसळकर व अमोल शेलार यांच्या डोक्यावर बियरची बाटली मारली. त्यामुळे ते दोघे जखमी झाले. जखमी अवस्थेत शेलार हा रस्त्याने पळत सुटला त्याच्या पाठीमागे हातात लाकडी दांडा घेवून काही गोळीबार करणारे आरोपी पळाले. अशातच मयुर वाघ याने अमोल शेलार हा पळत आहे, हे पाहिले व त्याने लागलीच त्याच्या कमरेमध्ये खोचलेला गावठी कट्टा काढून पहिला फायर हवेत करून आवाज केला. त्यानंतर तो अमोल शेलार याच्या पाठीमागे पळाला व त्याच्याकडे नेम धरून त्याला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्यावर दोन वेळा फायरींग केली. परंतु अमोल हा पळत असल्याने त्याचा नेम हुकला आणि मोठी दुर्घटना टळली. तर चौथा अनोळखी इसम हा रस्त्यावरच मोटारसायकल जवळ उभा होता. त्यावेळी फायरींगच्या आवाजाने तेथे लोक जमा झाल्याने आलेले चौघेजण पुन्हा त्यांच्या मोटार सायकलवर बसुन नेवाशाच्या दिशेने पळाले. इतक्यात नेवासा पोलिसांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय करे यांनी जखमींना प्रथमोपचारासाठी नेवासा फाटा येथील ग्रामिण रुग्णालयात दाखल केले. या गोळीबार प्रकरणात आकाश कुसळकर याच्या फिर्यादीवरुन चौघांविरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७,३२४,५०४,५०६,३४, शस्त्र अधिनियम ३ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या गोळीबाराच्या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडालेली आहे. तालुक्याचे विशेष कार्यकारी अधिकारी तथा दंडाधिकारी असलेल्या तहसिलदार यांच्या बंगल्याजवळ ही घटना घडल्यामुळे, गुन्हेगारांवर पोलिसांचा 'वचक' नसल्याचे या घडलेल्या घटनेवरुन समोर आले. पोलिसांना गुन्हेगारी मोडीत काढण्याचे मोठे आव्हान या घटनेतून पुन्हा एकदा उभे ठाकले असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा: स्वत:च्याच घरातील 35 तोळ्याचे दागिने चोरणार्‍या मुलास पोलिसांनी चोवीस तासात केले गजाआड

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.