औरंगाबाद - बनावट पोलिस उपधीक्षकाने अनेक ठिकाणी दहशत निर्माण केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याची दमदाटी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबद्दल जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेबाबत कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
Aurangabad Crime : बनावट पोलिस उपधीक्षकाची दहशत, जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल - औरंगाबादमध्ये बनावट पोलीसाची दहशत
पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या संकेत जाधव हा इसम सुट्टीवर असताना औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस उपधीक्षक म्हणून दहशत निर्माण करत होता.याबद्दल जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेबाबत कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
Aurangabad Crime
औरंगाबाद - बनावट पोलिस उपधीक्षकाने अनेक ठिकाणी दहशत निर्माण केल्याची माहिती उघड झाली आहे. त्याची दमदाटी सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याबद्दल जीन्सी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेबाबत कारवाई सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणाऱ्या संकेत जाधव हा इसम सुट्टीवर असताना औरंगाबाद शहरात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस उपधीक्षक म्हणून दहशत निर्माण करत होता. जालना रस्त्यावर आकाशवाणी जवळ हाईड आउट या हॉटेल मध्ये रात्री संकेत जाधव आला. त्याने पिझ्झा देण्यास सांगितले. मात्र, हॉटेल बंद होत असल्याने मॅनेजरने नकार दिला. त्यावरून मी पोलीस उपाधीक्षक असल्याचे सांगून पोलिसांकडे असतो. तसा दांडा हातात घेऊन दमदाटी करण्यास सुरुवात केली. इतकंच नाही तर आधीपासून तिथे असलेल्या ग्राहकांना देखील दमदाटी करत निघून गेला.
निराला बाजार येथे झाला वाद
बनावट पोलिस उपधीक्षक संकेत जाधव त्यादिवशी दारूच्या नशेत होता. हॉटेल चालकाला दमदाटी केल्यानंतर निराला बजार येथे आमदार पुत्राच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात घुसून भांडण केले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्याला चोप दिल्याचं देखील समोर आल आहे.