औरंगाबाद : आंतरराष्ट्रीय बाल पुस्तक दिन दिनाच्या निमित्ताने प्रत्येक बालकाच्या हातात छान छान पुस्तक आली पाहिजे. आणि त्याला ती वाचायला मिळाल्या पाहिजे. जितकी आपल्याला अन्नाची भूक असते. तितकीच बुद्धीच्या मशागतीची गरज असते. यामुळे ही मशागत बालवयात पुस्तकांच्या माध्यमातून होत असते.आंतरराष्ट्रीय बालक पुस्तिका दिन साजरा करत असताना फक्त साजरा करून चालणार नाही. तर ज्यांच्यासाठी आपण बाल पुस्तक दिन साजरा करत आहे त्या बालकांपर्यंत हे पुस्तक पोहोचली पाहिजे. त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे.आपल्याकडेच बालसाहित्य अतिशय वैभवशाली आहे हे साहित्य बालकांपर्यंत पोहोचलं पाहिजे असे ज्येष्ठ बाल साहित्यिक लीला शिंदे म्हणाल्या.
हेही वाचा - Raj Thackeray : राज कडाडले! राजकीय नेत्यांवर घणाघात; मतदारांचेही टोचले कान
पालकांनी बालकांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करावी
घरामध्ये आई-वडीलांनीच लहान मुलांना पुस्तक त्यांना उपलब्ध करून दिले पाहिजे. बालकाला स्वातंत्र्य नाही आणि त्यालाच सांगताही येत नाही आणि कळत नाही. त्यामुळे आई-वडिलांनी आपल्या परिस्थितीनुसार चांगले चांगले बालसाहित्य मुलांना वाचनासाठी द्यावे. बालवयात बालकांचा सर्वांगीण विकास पुस्टकतून होत असतो. त्यासोबत बौद्धिक मानसिक-शारीरिक या सुप्त गुणांचा विकास या पुस्तकाच्या माध्यमातून होत असतो. त्यामुळे आई-वडिलांनी आवर्जून मुलांना वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी पुस्तके उपलब्ध करून दिली पाहिजे.
स्मार्ट सिटी मध्ये बाल ग्रंथालये असणे गरजेचे
स्मार्ट सिटी च्या माध्यमातून होत असलेल्या विकास म्हणजे स्मार्टनेस होत नाही यातून फक्त भौतिक सुख निर्माण होत आहे. मात्र, उद्याचा चांगला नागरिक निरर्थक राहिला किंवा पोकळ राहिला किंवा त्याच्यामध्ये काही संवेदना राहिले नाही. समाजशील राहिली नाही. माणसासाठी आपुलकी नसेल तर या स्मार्ट विकासाला काय अर्थ आहे. बालकांमधील जपायला पाहिजे विचार गरजेचा आहे. पाश्चिमात्य देशात बालकांसाठी बाल ग्रंथालय आहेत. बाल रंगभूमी ही फक्त सुट्यामध्ये सुरू नसते तर वर्षभर सुरू असतात. आपल्याकडे मात्र बालसाहित्याला खूप दुय्यम स्थान देतो. आजचा बालक हा उद्याचा चांगला नागरिक बनणार आहे. यामुळे राजकीय आणि शासकीय पातळीवर विचार होणे. बालकांच्या विकासासाठी बालरंगभूमी चित्रकला या सारख्या कलांना प्रोत्साहन देणे गरजेचे असल्याचे मत ज्येष्ठ बालसाहित्यिक विलास शिंदे यांनी बोलताना व्यक्त केले.
हेही वाचा - 'राज ठाकरे हे तर पुष्पातले फुसके फ्लॉवर'; शरद पवारांवरील टीकेला रुपाली पाटलांकडून प्रत्युत्तर