औरंगाबाद - कोविड काळात रुग्णांना तातडीने उपचार देण्यासाठी कोविड सेंटर आवश्यक आहेत. भाजपाचा उद्देश्य सेवा देणे आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील दोन भाजपा आमदारांनी कोविड सेंटर सुरू केले असून, तिथे मोफत उपचार मिळणार आहेत, असं विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
आमदार अतुल सावे यांच्या कोविड सेंटरचे उद्घाटन
औरंगाबाद पूर्वचे आमदार अतुल सावे यांनी 'सीएसआर' फंडातून 50 खाटांचे कोविड सेंटर सुरू केले आहे. या कोविड सेंटरमध्ये 20 ऑक्सिजन बेडची देखील सोय करण्यात आली आहे. या ऑक्सिजन सेंटरचे उद्घाटन विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी मात्री मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार डॉ.भागवत कराड, महिला आघाडीच्या विजया रहाटकर, आमदार अतुल सावे, नारायण कुचे यांची उपस्थिती होती.
कोरोना रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे महत्त्वाचे
कोविडचा वाढता प्रादुर्भाव पाहता वेळेवर उपचार मिळणे, ऑक्सिजन मिळणे गरजेचे आहे. त्यासाठी कोविड सेंटर महत्त्वाचे असून, अतुल सावे यांनी उभारलेल्या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजन बेडची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. या कोविड सेंटरमध्ये रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार असल्याची माहिती फडणवीस यांनी यावेळी दिली.
हेही वाचा - तौक्ते चक्रीवादळ : सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि मुंबई किनारपट्टीची दृश्य