औरंगाबाद - जिल्ह्याच्या राजकारणात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांच्यातील अंतर्गत वाद काही नवे नाहीत. मात्र, त्यातच आता खैरे यांनी दानवे आणि माझी लेवल एक नाही, मी राज्यातील 13 नेत्यांपैकी एक असल्याचे वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे.
खैरे - दानवे वाद जुनेच
शिवसेना नेते चंद्रकांत खैरे आणि शिवसेना जिल्हाध्यक्ष आमदार अंबादास दानवे यांच्यात वाद हे नेहमीच पाहायला मिळाले. अनेक वेळा अंतर्गत वादाची चर्चादेखील रंगली आहे. (Chandrakant Khaire Vs Ambadas Danve ) त्यातच दोघांमध्ये मोठा दुरावा निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिवसेनेत दोन गट पडले आहेत का? याबाबत खैरे यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर माझी आणि दानवे यांची एक लेवल नाही. मी पक्षातील तेरा नेत्यांपैकी एक आहे. (Shiv Sena leader Chandrakant Khaire) पक्ष घटनेनुसार ते पद आहे. नेते, संपर्क, संपर्क नेते आणि नंतर जिल्हाप्रमुख असा क्रम लागतो. त्यामुळे दानवे आणि माझी बरोबरी करण्याचा प्रश्नच येत नाही. मी कोणालाही अडवण्याचा प्रयत्न केला नाही. मी जर तसे केला असते, तर आज काड्या करणारी लोक मोठी झाली नसती. असा टोला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी अप्रत्यक्षरीत्या अंबादास दानवे यांना लावला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांमुळे सत्तार माझ्यात मैत्री
राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार स्थानिक नेत्यांवर टीका करत आले आहेत. पक्ष हाच माझा नेता आहे. त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या त्यांनी अनेक वेळा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकास्त्र टाकले होते. मात्र, आता माझी आणि त्यांच्यात चांगली मैत्री झाली आणि ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांमुळे शक्य झाले असे मत खैरे यांनी व्यक्त केले आहे. फुलंब्री येथे महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण निमित्त आमच्या चर्चा झाली. ते थोडे उत्साही आहेत. मात्र, ठीक आहे. शिवसेना बांधून ठेवण्याचे काम मी अनेक वेळा केले आहे. राजकारणात अनेक वेळा शत्रू मित्र होतात आणि मित्र शत्रू होतात. मात्र, पक्ष सांभाळायचा म्हणजे या सर्व गोष्टी कराव्या लागतात आणि ते मी आजपर्यंत केला आहे असही खैरे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - औरंगाबादेतील क्रांतिचौकात इतिहासाची साक्ष देणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक