औरंगाबाद - कोरोना लसीमुळे (Covid-19 Vaccination) संसर्ग (Coronavirus disease) होत नाही असे नाही. लसीमुळे गंभीरता राहत नाही. यामुळे राज्यात शंभर टक्के लसीकरण (Vaccination) झाले पाहिजे, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. काही जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी लसीकरण सक्तीचे केले. मात्र लसीकरणाची सक्ती करता येणार नाही. लस घेण्यासाठी नागरिकांचे समुपदेशन करा अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांना केल्या असल्याचे म यांनी सांगितले. ते औरंगाबादेत जागतिक मधुमेह दिनाच्या (world diabetes day) निमित्ताने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.
तर लहान मुलांनाही लसीकरण -
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्यातील शाळा महाविद्यालय सुरू करण्यात आली आहे. शाळेतील विद्यार्थ्यांच्या लसीकरण करण्याबद्दल केंद्र सरकार व आरोग्य विभागाच्या सूचना आल्या नाहीत. शाळेतील मुलांना लसीकरण करण्याच्या सूचना येताच राज्यातील विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यात येईल असे देखील टोपे म्हणाले.
लसीकरण वाढवण्यासाठी धर्मगुरूंची मदत घेणार -
राज्यात काही ठिकाणी लोक धार्मिक अडचणी करू पाहत आहे. नागरिकांमध्ये गैरसमज पसरवले जात आहेत. यासाठी ज्या धर्माचे लसीकरणाचे प्रमाण कमी आहे. अशा धर्मातील धर्मगुरूंना तसेच त्या धर्माशी संबंधित महत्त्वाच्या लोकांना सांगून लसीकरण करण्यासाठी आवाहन करण्यात येणार आहे. राज्यात जास्तीत जास्त लसीकरण करून घेण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे ही आरोग्यमंत्री टोपे म्हणाले.
हेही वाचा - Health Minister on vaccination : नोव्हेंबर अखेर राज्यात १०० टक्के लसीकरण पूर्ण करण्याचा प्रयत्न - राजेश टोपे