औरंगाबाद: जगाचे तोंड गोड करण्याचं काम सध्या भारत करत आहे. कारण साखर उत्पादनात ब्राझीलला मागे टाकत, जगात आपण अव्वल ठरलो. मागील काही वर्षात उसाचे क्षेत्रफळ वाढल्याने साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मात्र मराठवाड्यात मागील वर्षी मोठ्याप्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतात उभा ऊस चिंतेचे कारण ठरला होता हे देखील तितकच खरं आहे.
कृषीतज्ञ डॉ भगवान कापसे यांनी दिली माहिती सध्या स्थितीत भारतात 36.88 दशलक्ष टन साखर उत्पादन केली जात आहे. त्या खालोखाल ब्राझील 35.35 दशलक्ष टन, युरोपियन युनियन 16.57, थायलंड 10.25, चायना 9.6, तर युनायटेड स्टेट मध्ये 8.37 दशलक्ष टन साखर उत्पादन केले जात आहे. ऊस उत्पादनाचा विचार केला, तर महाराष्ट्रात उसाचे उत्पादन 50 ते 60 टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी दहा लाख टन उत्पादन करणारा महाराष्ट्र सध्या 15 लाख टन ऊस लागवड करत आहे. या विषयांची माहिती कृषीतज्ञ डॉ भगवान कापसे यांनी दिली आहे.
जगात भारत अव्वल आजपर्यंत जगात ब्राझील साखर उत्पादनात देशात अव्वल होता. मात्र नुकत्याच आलेल्या आकडेवारीनुसार भारतात ब्राझीलपेक्षा अधिक उत्पादकता वाढल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे जगाचा तोंड गोड करण्याची क्षमता भारतात निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. सध्या स्थितीत भारतात 36.88 दशलक्ष टन साखर उत्पादन केली जात आहे. त्या खालोखाल ब्राझील 35.35 दशलक्ष टन, युरोपियन युनियन 16.57, थायलंड 10.25, चायना 9.6, तर युनायटेड स्टेट मध्ये 8.37 दशलक्ष टन साखर उत्पादन केले जात आहे. तर यावर्षी देखील उसाचे विक्रमी उत्पादन होईल असा अंदाज कृषीतज्ञ डॉ भगवान कापसे यांनी व्यक्त केला आहे.
पाऊस वाढल्याने उसाचे क्षेत्र वाढले ऊस उत्पादनाचा विचार केला, तर महाराष्ट्रात उसाचे उत्पादन 50 ते 60 टक्क्यांनी वाढला आहे. दरवर्षी दहा लाख टन उत्पादन करणारा महाराष्ट्र सध्या 15 लाख टन ऊस लागवड करत आहे. गेल्या काही वर्षात पावसाचे प्रमाण वाढल्याने हे उत्पादन वाढल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे. विशेषतः मराठवाडा दुष्काळी भाग समजला जात होता. मात्र याच ठिकाणी उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात वाढल आहे. मागील वर्षी साखर कारखान्यांच्या क्षमतेपेक्षा अधिक गाळप करावं लागलं, तर काही कारखानदारांनी आपली क्षमता देखील वाढवली. तरीदेखील काही प्रमाणात ऊस शेतातच राहिला. यावर्षी देखील अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज असल्याचं व्यक्त केले आहे.
उसाचे उत्पादन कमी करण्याची गरज ऊस उत्पादनाला पाणी मोठ्या प्रमाणात लागतं. त्यामुळे कमी पाणी असलेल्या भागात ऊस नको, असा आग्रह तज्ञांनी अनेकवेळा व्यक्त केला आहे. त्यात मराठवाड्यात जेमतेम पाऊस दरवर्षी पडतो आणि याच भागात उसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जात आहे. परिणामी जमिनीतलं पाणी पूर्णतः कमी होत आहे. उसाचे उत्पादन घेताना कमी मेहनत लागते. लागवड केल्यावर ऊस तोडण्याचे काम देखील कारखानदार करून घेतात. त्यामुळे या पिकाकडे मोठा कल शेतकऱ्यांचा असतो. हा निर्णय भविष्यासाठी घातक आहे. त्यामुळे मराठवाड्यासारख्या कमी पर्जन्य असलेल्या भागांमध्ये ऊस लागवड बंद करा, अशी मागणी कृषी अभ्यासकांनी व्यक्त केली आहे. तर काही वर्षांपूर्वी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी पत्र काढून शासनाकडे हीच मागणी केली होती. मात्र त्यावेळी राजकीय मंडळींनी टीका केली होती. मागणीकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.
शेतकऱ्यांनी फळ बागेकडे वळावं एक एकर उसासाठी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जातं. तेवढ्याच पाण्यामध्ये आंबा किंवा मोसंबी सारखं उत्पादन येऊ शकतं. सोप पीक घेणे शेतकऱ्यांना आवडत असलं, तरी इतर फळबाग लावून थोडी काळजी घेतली. तर चांगलं उत्पन्न मिळू शकतं. उसाचे कारखानदार श्रीमंत होत असले, तरी त्यामानाने ऊस उत्पादक शेतकरी श्रीमंत झाल्याचं खूप कमी प्रमाणात दिसून येतं आहे. त्या बदल्यात जर शेतकऱ्यांनी आंबा, मोसंबी किंवा इतर फळबाग लक्षपूर्वक लावली, तर मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा त्यांना होऊ शकतो. त्यामुळे आता शेतकऱ्यांनी फळबागेकडे वळावं, असा सल्ला कृषीतज्ञ डॉ भगवान कापसे यांनी दिला आहे.