ETV Bharat / city

corona vaccination लसीकरणाबाबत कोणालाही सक्ती नाही, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती - aurangabad corona vaccination

कोरोना विषाणूला निर्बंध घालण्यासाठी लसीकरण (corona vaccination) गरजेचे असले तरी, नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे, राज्यभर औरंगाबाद पॅटर्न राबवणार असल्याची चर्चा आहे. मात्र, त्याबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, लसीकरण करणे हा ऐच्छिक विषय असल्याचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) म्हणाले.

corona vaccination
corona vaccination
author img

By

Published : Nov 15, 2021, 3:38 PM IST

Updated : Nov 15, 2021, 3:58 PM IST

औरंगाबाद - कोरोना विषाणूला निर्बंध घालण्यासाठी लसीकरण गरजेचे (corona vaccination) असले तरी, नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत आहे. त्यामुळे, राज्यभर औरंगाबाद पॅटर्न (aurangabad pattern) राबवणार असल्याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राज्यात रंगली आहे. मात्र, त्याबाबत कुठलाही निर्णय अद्याप झालेला नाही, लसीकरण करणे हा सर्वस्वी ऐच्छिक विषय असून, त्याबाबत जबरदस्ती करण्यात येणार नाही. मात्र, आम्ही जनजागृती करू, असे मत राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी व्यक्त केले.

माहिती देताना आरोग्यमंत्री राजेश टोपे

हेही वाचा - VIDEO : सेना आमदाराचे ग्रामसेवकांबद्दल वादग्रस्त वक्तव्य, 22 हजार ग्रामसेवक आक्रमक

हा आहे औरंगाबाद पॅटर्न

औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी काही दिवसांपूर्वी नवीन नियमावली जारी केली होती. त्यामध्ये शासकीय, निमशासकीय, खासगी क्षेत्रातील अधिकारी - कर्मचाऱ्यांना लसीकरण सक्तीचे (corona vaccination compulsory) करण्यात आले आहे. लस घेतली तरच डिसेंबर महिन्यात वेतन मिळेल, प्रवास करण्यासाठी मुभा, पर्यटनस्थळांवर प्रवेश, रेशन धान्य दुकानांवर मिळणाऱ्या सुविधा मिळतील, असे या नियमावलीत सांगण्यात आले होते. त्याचबरोबर, रोज लागणारे इंधन देखील लस घेतली असेल तरच मिळेल, अन्यथा या सर्व सुविधा मिळणार नाहीत, असा औरंगाबाद पॅटर्न तयार करण्यात आला आहे.

लसीकरण सक्ती नाही (corona vaccination not compulsory)

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी लावलेल्या नवीन नियमांची चर्चा होत आहे. हा निर्णय चांगला असून लसीकरण वाढविण्यास मदत होईल, म्हणून औरंगाबाद पॅटर्न (aurangabad pattern) राज्यभर राबवण्याचे बोलले जात आहे. मात्र, अशी सक्ती करता येणार नाही, लस घेणे हा ऐच्छिक आहे. त्यामुळे जागृती करून नागरिकांना समजावून सांगून लसीकरण केंद्रापर्यंत आणण्याचा मानस असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सांगितले.

राज्यात दहा कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे. सात कोटी लोकांचा पहिला डोस (vaccination first dose), तर तीन कोटींहून अधिक लोकांचा दुसरा डोस पूर्ण झाला आहे. राज्याची आकडेवारी पाहिली तर 80 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. महिन्याच्या अखेरपर्यंत लसीकरणाचा पहिला डोस देण्याची मोहीम शंभर टक्के पूर्ण होईल. मात्र, असे करत असताना कुठलीही सक्ती न करता नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने लस घ्यावी, यासाठी निश्चित प्रयत्न करू, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

हेही वाचा - नवाब मलिक यांच्यामुळे आम्हाला त्रास होतोय, समीर वानखेडे यांच्या नातेवाईकांचा आरोप

Last Updated : Nov 15, 2021, 3:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.