ETV Bharat / city

कोरोनामुळे अवयव प्रत्यारोपण शास्त्रक्रियेवर मोठा परिणाम, शस्त्रक्रिया 50 ते 60 टक्के कमी झाल्याची डॉ. सुधीर कुलकर्णी यांची माहिती

author img

By

Published : Jul 31, 2021, 4:50 PM IST

कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम झाले आहेत. त्यात अवयव प्रत्यारोपण आणि अवयवदान यामध्येही फरक पडला असल्याचे दिसून आले आले आहे. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 2019 च्या तुलनेत जवळपास 50 ते 60 टक्के कमी होत असल्याची माहिती, अवयव प्रत्यारोपण समिती अध्यक्ष तथा एमजीएम रुग्णालयाचे डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

कोरोनामुळे अवयव प्रत्यारोपण शास्त्रक्रियेवर मोठा परिणाम, डॉ. सुधीर कुलकर्णी माहिती

औरंगाबाद - कोरोना महामारीमुळे माणसाच्या जीवनावर अनेक प्रकारे परिणाम झाले आहेत. त्यात अवयव प्रत्यारोपण आणि अवयवदान यामध्येही फरक पडला असल्याचे दिसून आले आले आहे. किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया 2019 च्या तुलनेत जवळपास 50 ते 60 टक्के कमी होत असल्याची माहिती अवयव प्रत्यारोपण समिती अध्यक्ष तथा एमजीएम रुग्णालयाचे डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

कोरोनामुळे अवयव प्रत्यारोपण शास्त्रक्रियेवर मोठा परिणाम, शस्त्रक्रिया 50 ते 60 टक्के कमी झाल्याची डॉ. सुधीर कुलकर्णी यांची माहिती

'अत्यावश्यक प्रत्यारोपण होते सुरू'

मार्च 2020 पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, अनेक निर्बंध लावण्यात आले होते. ज्यामध्ये अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करू नयेत, असे निर्देश देण्यात आले होते. मात्र, जीव वाचवण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या शस्त्रक्रिया करण्यास सूट देण्यात आली होती. ज्यामध्ये अत्यावश्यक असलेल्या हृदय आणि लिव्हर शस्त्रक्रिया करण्यास सूट होती. त्यामुळे मागील दीड वर्षांमध्ये अत्यावश्यक प्रत्यारोपण करण्यात आले. अशी माहिती डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

'दीड वर्षात 50 टक्क्यांहून अधिक परिणाम'

कोरोनामुळे अवयव प्रत्यारोपण शास्त्रक्रियांवर परिणाम झाला त्याप्रमाणे अवयव दात्यांचे प्रमाण कमी झाल्याचे, दिसून येत आहे. कोरोना येण्यापूर्वी म्हणजेच 2019 साली महाराष्ट्रात 160 अवयव दान प्रक्रिया झाल्या, तर कोविड काळात 2020 साली 78 अवयव दान झाले, तर चालू वर्षात 2021 मध्ये आज पर्यंत 39 अवयव दानाच्या प्रक्रिया पार पडल्या आहेत. त्यात अवयवदान करणे किंवा शस्त्रक्रिया करताना जोखीम घेण्याची तयारी असणाऱ्या रुग्णांची अवयव दान किंवा शस्त्रक्रिया करण्यात आल्या, अशी माहिती अवयव प्रत्यारोपण समिती अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

'दाते तयार असणाऱ्या प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या सुरू'

अवयवदान करण्यासाठी दाते जागरूक झाले होते. कोरोना परिस्थितीच्या पूर्वी त्यांची संख्या वाढल्याने, अनेकांना जीवनदान मिळाले. मात्र, मागील दीड वर्षांमध्ये मराठवाड्यात अवयवदान करणाऱ्यांची संख्या नगण्य झाली आहे. कोरोना असला तरी अत्यावश्यक असलेल्या आणि दाते असलेल्या रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेषतः रक्ताचे नातेवाईक दाते असलेल्या रुग्णांच्या शस्त्रक्रिया आता सुरू झाल्या असल्या, तरी दाते नसलेल्या रुग्णांचे अवयव प्रत्यारोपण दाते मिळेपर्यंत अद्याप होऊ शकणार नाहीत, अशी माहिती डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

'अपघात कमी झाल्याने ब्रेन डेडच्या घटना झाल्या कमी'

रस्ते अपघातात जखमी झालेल्या रुग्णांमध्ये ब्रेनडेड असलेल्या रुग्णांमुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. मात्र, मागील दीड वर्षांपासून लॉकडाऊनमुळे आणि असलेल्या निर्बंधांमुळे रस्त्यावरील वाहतूक कमी प्रमाणात सुरू आहे. परिणामी रस्ते अपघात कमी झाल्याने, ब्रेनडेडच्या घटना देखील कमी झाल्याने अवयव दान कमी झाले आहे. त्यामुळे देखील अवयव दान आणि प्रत्यारोपण शास्त्रक्रियेवर परिणाम झाल्याची माहिती अवयव प्रत्यारोपण समिती अध्यक्ष डॉ. सुधीर कुलकर्णी यांनी दिली.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.