औरंगाबाद - काँग्रेस पक्ष शिवसेनेसोबत राहिल्यास उभारी घेईल, काँग्रेस सरकारसोबत आली नसती, तर काय अवस्था झाली असती, सर्वांना माहिती आहे, अशी टीका राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी केली. शिवसेना म्हणजे मेन फ्यूज आहे. काँग्रेस राष्ट्रवादी म्हणजे बाजूचे फ्यूज आहेत. मेन फ्यूजला धक्का लावला, तर आपोआप सगळे बंद होईल, अशी मिश्किल टोलेबाजीही त्यांनी केली.
'17 तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दौऱ्यावर' -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहण करणार आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद इमारतीचे ते भूमिपूजन करतील. वर्षभरात नवीन इमारत सज्ज होईल, असा विश्वास अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला.
'राणे यांनी चारआणे सारख वागू नये' -
चिपी विमानतळाबाबत केंद्रीय उड्डाण मंत्र्यांचे मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे. स्वतः पंतप्रधान मुख्यमंत्र्यांनाचा आदर करतात. त्यामुळे नारायण राणे यांनी राणे सारखे बोलावे चारआणे सारखे बोलू नये. नारायण राणे यांना स्वाभिमान पाहिजे, पण ते जलसी आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
'विमा कंपन्यांनी त्यांची पॉलिसी बदलायला हवी' -
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांनाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात विमाकंपनी 72 तासांत माहिती कळवा, असे म्हणत असले तरी, विमा कंपनीचे फोन लागत नाही, तर दुसरीकडे त्यांचे ऑनलाईन अॅप देखील काम करत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी, तहसीलदार, तलाठी यांच्यामार्फत केलेले पंचनामे ग्राह्य धरून शेतकऱ्यांना विमा कंपन्यांनी मदत करायला हवी, अशी मागणी राज्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी केली. इतकेच नाही तर केंद्र सरकारने विमा कंपन्यांना बाबतचे धोरण बदलायला हवे, हे धोरण लवकर बदलले जावे, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री लवकरच केंद्राकडे विनंती करणार असल्याचेदेखील अब्दुल सत्तार यांनी सांगितले.
'आतापर्यंत जिल्हा परिषदेला 50 रुग्णवाहिका दिल्या' -
14 व्या वित्तआयोगाच्या पैशांवर मिळालेल्या व्याजाच्या पैशातून जिल्हा परिषदेला 25 रुग्णवाहिका दिल्या असल्याची माहिती अब्दुल सत्तार यांनी दिली. जिल्हा परिषदेच्या प्रांगणात रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. पुण्याच्या एका खात्यात व्याजाचे पैसे पडलेले होते. हे पैसे परत जाणार होते. त्यामुळे कोविडच्या काळात गरजेच्या असणाऱ्या रुग्णवाहिका घेतल्या असून आमदार निधीतूनदेखील काही रुग्णवाहिका आल्या आहेत. जवळपास 50 रुग्णवाहिका आतापर्यंत जिल्हा परिषदेला देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
हेही वाचा - मंदिरे उघडल्यानेच कोरोना पसरतो का ? मोरगावमधील महिलांचा सवाल