औरंगाबाद - अनेक वर्षांपासून प्रतीक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati Shivaji Maharaj Statue) अखेर क्रांती चौकात (Aurangabad Kranti chowk) दाखल झाला. मध्यरात्री तीनच्या सुमारास हा पुतळा क्रांती चौकात दाखल झाला. त्यावेळी अनेक शिवप्रेमी तिथे उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज की जय च्या जयघोषाने पूर्ण परिसर दणाणून गेला होता.
पुतळ्याची उंची वाढवण्याची झाली होती मागणी
शहरातील मुख्य रस्ता असलेल्या क्रांती चौकात वाहतूक खोळंबा होऊ नये याकरिता उड्डाणपूल बांधण्यात आला. मात्र हा उड्डाणपूल तयार झाल्यानंतर शिवाजी महाराजांचा पुतळा पुलाखालून येत होता. त्यामुळे महाराजांच्या पुतळ्याची उंची वाढवण्याची मागणी शिवप्रेमींनी केली होती. त्यानुसार महानगरपालिकेने पुतळ्याची उंची वाढविण्याचा प्रस्ताव मंजुर केला. मात्र अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षांत पुतळ्याची उंची वाढवण्याचा कामाल वेग मिळत नव्हता. त्यामुळे शिवप्रेमी संतप्त झाले होते. त्यात कोरोणामुळे दीड वर्ष काम रखडले होते. मात्र सोमवारी मध्यरात्री अखेर हा पुतळा क्रांती चौकात बसवण्यात आला. या चौकाचे सुशोभीकरणाचे काम अद्याप बाकी असून पुतळ्या बसल्यावर उर्वरित काम केले जाणार आहे.
1982 मध्ये झाली होती पुतळ्याची स्थापना
क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची स्थापना 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांचा हा पुतळा तिथे बसवण्यात आला आहे. राज्यातील सर्वात मोठा पुतळा शहरात बसवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. औरंगाबाद शहरात 1970 च्या काळात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला सुरुवात झाली होती. त्यावेळ क्रांती चौकात महाराजांचा पुतळा उभारण्याचा प्रस्ताव शिवजयंती महोत्सव समितीतर्फे तत्कालीन नगर परिषदेकडे पाठवण्यात आला होता. त्यावेळच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली होती, मात्र निधी नसल्याने जिल्हा परिषद कडे मागणी करण्यात आली. त्यावेळेस तो निधी उपलब्ध झाला होता अशी माहिती छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समितीचे संस्थापक पृथ्वीराज पवार यांनी दिली.
एक राजे एक जयंती साजरी करण्याची मागणी
25 फूट उंच आणि तब्बल 8 टन वजन असलेला हा पुतळा क्रांती चौकात विराजमान झाला आहे. एका मोठ्या उघड्या ट्रकमधून पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या बंदोबस्तात हा पुतळा क्रांती चौकात दाखल आला. पुतळ्याचे स्वागत करण्यासाठी अनेक शिवप्रेमी मध्यरात्री क्रांती चौकात दाखल झाले होते. यावेळी शिवप्रेमींनी जयघोष केला. आता राज्यात एक राजा एक जयंती साजरी करायला हवी, यात कुठलेही राजकारण आणू नये अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते आणि शिवप्रेमी विनोद पाटील यांनी यावेळी केली. यावेळी अभिजीत देशमुख, दत्ता भांगे, राजू शिंदे, सुरेंद्र कुलकर्णी, गोकुळ मलखे, विशाल दाभाडे, राजेंद्र दानवे रमेश इधाटे इत्यादी सह शिवप्रेमी उपस्थित होते.
Shivaji Maharaj statue in aurangabad : छत्रपती महाराजांचा पुतळा क्रांतिचौकात दाखल, शिवप्रेमींमध्ये उत्साह - क्रांती चौकात शिवाजी महाराजांचा पुतळा
औरंगाबाद येथील क्रांती चौकातील (Aurangabad Kranti chowk) छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याची (Chatrapati Shivaji Maharaj Statue) स्थापना 1982 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या हस्ते झाली होती. त्यानंतर आता दुसऱ्यांचा हा पुतळा तिथे बसवण्यात आला आहे.