ETV Bharat / city

संस्थान गणेश येथे सेना-भाजप नेत्यांचे युतीवर मौन, बाप्पांचे विसर्जन साध्या पद्धतीने - औरंगाबाद

शिवसेना-भाजप युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील, अशी प्रतिक्रिया केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड व शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. औरंदगाबाद येथील संस्थान गणपती विसर्जन ठिकाणी ते बोतल होते. यावेळी मंत्री कराड यांना इंधन जीएसटीच्या कक्षात येणार होते त्याचे काय झाले, असा सवाल करण्यात आला. त्यावर ते म्हणाले, यासाठी राज्याच्या अर्थमंत्र्यांसोबत बैठक होती आपल्या राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी यास नकार दिला. अन्यथा पेट्रोलचे दर कमी झाले असते.

v
v
author img

By

Published : Sep 19, 2021, 3:22 PM IST

औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी युतीबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले असताना स्थानिक नेते मात्र सावध भूमिका घेताना दिसत आहेत. संस्थान गणपती विसर्जन ठिकाणी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी युतीबाबत मौन बाळगत एकमेकांवर टोलेबाजी केली.

बोलताना केंद्रीय राज्यमंत्री कराड व सेना नेते खैरे

इंधनावर जीएसटीला अजित पवार यांनी केला विरोध

इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्यासाठी झालेल्या बैठकीत राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोध केला आहे. यामुळे पेट्रोलचे दर कमी झाले नाही. अन्यथा पेट्रोल स्वस्त झाले असते, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड म्हणाले.

सत्तेसाठी भाजप तत्व सोडणार नाही

सेना-भाजप युतीचा निर्णय पक्ष घेईल. पण, औरंगाबाद महापालिकेच्या निवडणुकीत युती होणार नाही. औरंगाबाद महापालिका निवडणुकीत भाजप स्वतंत्र लढून सत्ता स्थापन करेल. सत्तेसाठी भाजप कधीही तत्व सोडणार नाही, असा टोला केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भगवात कराड यांनी लगावला.

युतीचा निर्णय वरिष्ठ नेते घेतील

युतीबाबत बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी शिवसेना-भाजप युतीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे निर्णय घेतील. मी हिंदुत्वाच्या बाजूने आहे, असे म्हणत त्यांनी युतीच्या प्रश्नावर बोलणे टाळले. लवकरच कोरोनाचे सावट जाऊ दे, अशी मनोकामना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी केली आहे.

संस्थान गणपतीचे हौदात विसर्जन

शहराचे ग्रामदौवत असलेल्या संस्थान गणपतीच्या प्रतिकृतीचे मंदिरासमोर कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, आमदार अतुल सावे, माजी महापौर नंदकुमार घोडेले यांच्यासह मंदिर विश्वस्त यांच्या हस्ते विधिवत पूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर मंदिरासमोर तयार केलेल्या कृत्रिम हौदात श्रीच्या मूर्तीचे कृत्रिम हौदात विसर्जन करण्यात आले. यावेळी कोरोनाचे विघ्न जाऊदे, अशी मनोकामना केंद्रीयमंत्री भागवत कराड आणि शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी व्यक्त केली.

हेही वाचा - 'काँग्रेसवाले ताप देतात तेव्हा मी भाजपावाल्यांना बोलावतो'; मुख्यमंत्र्यांनी दानवेंच्या कानात केली कुजबुज

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.