ETV Bharat / city

मुलानेच केली आई वडिलांची हत्या, आरोपी देवेंद्रला शिर्डीतून अटक - शिर्डी येथून अटक

पुंडलिकनगर भागात दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे उघड झाल असून त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. सोमवारी (दि. 23 मे) शामसुंदर कलंत्री आणि अश्विनी कलंत्री या दाम्पत्याचा मृतदेह घरात आढळून आला होता.

आरोपी शामसुंदरपुंडलिकनगर भागात दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे उघड झाल असून त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. सोमवारी (दि. 23 मे) शामसुंदर कलंत्री आणि अश्विनी कलंत्री या दाम्पत्याचा मृतदेह घरात आढळून आला होता.

author img

By

Published : May 24, 2022, 5:07 PM IST

औरंगाबाद - पुंडलिकनगर भागात दाम्पत्याची हत्या त्यांच्याच मुलाने केल्याचे उघड झाल असून त्याला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिर्डी येथून अटक केली आहे. सोमवारी (दि. 23 मे) शामसुंदर कलंत्री आणि अश्विनी कलंत्री या दाम्पत्याचा मृतदेह घरात आढळून आला होता.

आई वडिलांना संपवून मुलगा झाला पसार - शामसुंदर कलंत्री व्यवसायिक होते. गारखेडा गजानन नगर येथे मारोती मंदिराच्या बाजूला त्यांचे दुकान आणि घर त्यांचे आहे. त्यांचा मुलगा देवेंद्र दुकानातील पैसे घेत असल्याने शामसुंदर यांच्यासोबत काही दिवसांपासून वाद होते. शुक्रवारी दुकानातील सातशे रुपये त्याने घेतले. त्यावरून देवेंद्रचे आई वडिलांशी वाद झाले. शनिवारी सकाळी मुलगी वैष्णवीला महाविद्यालयात सोडवण्यासाठी आले असता घरी देवेंद्र आणि आई अश्विनी सोबत वाद झाले. त्यातून देवेंद्र याने आईच्या डोक्यात वार करून तिची हत्या केली. वडील घरी आल्यावर त्यांनाही त्याने यमसदनी पाठवले. त्यांचा मृतदेह घरावर असलेल्या पत्र्यांच्या खोलीत टाकला.

वैष्णवीला घरी येण्यापासून थांबवले - शनिवारी शामसुंदर आणि अश्विनी यांची हत्या केल्यावर देवेंद्रने वैष्णवीला फोन करून वडिलांच्या मित्राचा मृत्यू झाल्याने आम्ही धुळ्याला जात असून तु काकांकडे जा, असे त्याने सांगितले. रात्री वैष्णवीने पुन्हा फोन केला त्यावेळी वडील दुःखात आहेत. ते बोलू शकत नाही, असे सांगितले. काही वेळाने तर वडील म्हणून तो स्वतः वैष्णवीसोबत बोलला. रविवारी वैष्णवीने फोन केला असता फोन लागले नाही. म्हणून ती घरी गेली तर घराला कुलूप असल्याने ती पुन्हा काकांकडे गेली. सोमवारी ती घरी आली असता घराला कुलूप होते. मात्र, घरातून दुर्गंध येत होती. पोलिसांच्या मदतीने घरात प्रवेश केल्यावर आई वडिलांची हत्या झाल्याचे कळाले आणि वैष्णवी कोसळली.

आरोपीला शिर्डीतून अटक - मुलगा देवेंद्र कलंत्री आई वडिलांची हत्या करून पसार झाला. पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यावेळी एका महिलेसोबत त्यांचे संबंध असल्याची माहिती कळाली. त्यावरून पोलिसांनी त्या महिलेचा शोध घेतला. त्यावेळी तीने एका ठिकाणी ऑनलाईन पैसे पाठवल्याचे निष्पन्न झाल. ते पैसे शिर्डी येथील एका हॉटेलच्या खात्यात गेल्याचे कळल्याने गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शिर्डी येथे जाऊन देवेंद्र कलंत्रीला अटक केली.

हेही वाचा - Ulhasnagar Crime Branch : औरंगाबाद जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून फरार झालेल्या आरोपीला अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.