ETV Bharat / city

भाजपच्या ड्रीम प्रोजेक्टचे काम भाजपच पाडणार बंद - भाजप ड्रीम प्रोजेक्ट समृद्धी महामार्ग

भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धीचे काम भाजपचेच पदाधिकारी बंद पाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैजापूर तालुक्यातील काम बंद पाडण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी दिला आहे.

samruddhi mahamarg
samruddhi mahamarg
author img

By

Published : Feb 9, 2021, 9:00 PM IST

औरंगाबाद - भाजपचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या समृद्धीचे काम भाजपचेच पदाधिकारी बंद पाडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. वैजापूर तालुक्यातील काम बंद पाडण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी दिला आहे. समृद्धीच्या कामामुळे आसपासच्या गावातील अंतर्गत रस्ते खराब झाल्याने हा विरोध केला जात आहे.

कल्याण दांगोडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमित फुटाणे यांनी

वैजापूर तालुक्यात 150 किमीचे अंतर्गत रस्ते झाले खराब

वैजापूर तालुक्यातून जवळपास 55 किलोमीटरचा समृद्धी महामार्ग जात आहे. महामार्गाचे काम होत असताना, सामानाची वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे आसपासच्या गावातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. क्षमतेपेक्षा जास्त जड वाहनांची वाहतूक झाल्याने गाव रस्ते, राज्य मार्ग पूर्णतः खराब झाले आहेत. त्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी डांबर देखील आता राहिलेलं नाही. वैजापूर तालुक्यातील जवळपास दीडशे किलोमीटरचे 22 रस्ते खराब झाले आहेत. यासाठी जवळपास 74 कोटींचा खर्च करावा लागणार आहे. मात्र हा खर्च संबंधित कंत्राटदार किंवा राज्य सरकार करायला तयार नाही त्यामुळे महामार्गाचे काम बंद पाडण्याचा इशारा भाजपकडून देण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात रस्ते दुरुस्तीचे दिले होते आश्वासन

समृद्धी महामार्ग तयार करत असताना आसपासच्या गावातील अंतर्गत रस्ते खराब झाले आहेत. हे रस्ते दुरुस्त करण्याची मागणी गावकर्यांतर्फे गेल्या काही महिन्यापासून केली जात आहे. जून महिन्यामध्ये जिल्हा प्रशासनाला याबाबत निवेदन देण्यात आले होते. त्या वेळेस नोव्हेंबर 2020 पर्यंत रस्त्यांची काम सुरु केली जातील आणि सर्व अंतर्गत रस्ते हे दुरुस्त होतील असं आश्वासन देण्यात आलं होतं. समृद्धी महामार्ग तयार होत असताना संबंधित कंत्राटदारासोबत करण्यात आलेल्या करारानुसार महामार्ग तयार करत असताना आसपासच्या गावातील खराब होणाऱ्या रस्त्यांची दुरुस्ती करण्याची अट टाकण्यात आली आहे. मात्र नोव्हेंबर महिना उलटून गेल्यानंतरही अद्याप अंतर्गत रस्त्यांच्या कामाबाबत कुठलीही हालचाल झालेली नाही. त्यामुळे हे रस्ते दुरुस्त करण्याबाबत संबंधित कंत्राटदार आणि राज्य सरकार चालढकल करत असल्यामुळे समृद्धी महामार्गाचे काम बंद पडण्याची वेळ आल्याचं भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी सांगितलं.

10 फेब्रुवारीपासून काम बंद पाडण्याचा इशारा

शासनातर्फे रस्ते दुरुस्ती करण्यासाठी देण्यात आलेले आश्वासन अद्याप पूर्ण न झाल्याने समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडण्याचा निर्णय भाजपतर्फे घेण्यात आला आहे. वैजापूर तालुक्यात सुरू असलेल्या 55 किलोमीटर मार्गाचे काम वेगाने सुरू आहे. मात्र हे काम दहा फेब्रुवारीपासून बंद पाडण्याचा इशारा भाजप तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी दिला आहे. पीडब्ल्यूडी च्या अहवालानुसार रस्ते दुरुस्तीसाठी 74 कोटींची तरतूद आवश्यक आहे. मात्र राज्य सरकारची तिजोरी खडखडाट असल्याने ही तरतूद होणे शक्य नाही असं दिसून येत आहे. त्यामुळे खराब झालेले अंतर्गत रस्ते दुरुस्त होणार कसे हा प्रश्न आहे त्यामुळेच समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडण्याचा निर्णय घेण्यात आला असून जोपर्यंत अंतर्गत रस्ते दुरुस्तीबाबत हालचाली होत नाहीत तोपर्यंत महामार्गाचे काम सुरू होऊ देणार नाही असा इशारा भाजपचे तालुकाध्यक्ष कल्याण दांगोडे यांनी दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.