औरंगाबाद - शहराचा पाणी प्रश्न पेटत चालला ( Aurangabad Water Crisis ) आहे. पाणी पट्टी अर्धी कमी केली असली तरी पाणी कधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित करत मनसे तर्फे पाणी संघर्ष यात्रा काढण्यात आली आहे. या यात्रेत मनसे तर्फे नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याव्दारे 25 हजार तक्रारींचे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठवणात येणार असल्याचे मनसेतर्फे सांगण्यात ( mns send 25 thousand letter cm uddhav thackeray ) आले.
मनसे तर्फे राबवण्यात आली मोहिम - सिडको आणि हडको भागातील नागरिकांचा पाणी प्रश्न अधिक पेटत चालला आहे. त्यात मनसे तर्फे याच भागात आंदोलनाला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात मनसेने केलेले आंदोलन म्हणजे महापालिका निवडणुकीची तयारी समजली जात आहे. हातात फलक घेऊन पाण्याबाबत आपल्या तक्रारीचे पत्र देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. हातात रिकामा हंडा घेऊन लिहिलेली पत्र हंड्यात टाकण्यास सांगितली. 55 वॉर्डात ही मोहिम राबवण्यात येणार असून, 25 हजार पत्रक मुख्यमंत्र्यांना पाठवले जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनसे जिल्हाध्यक्ष सुमित खांबेकर यांनी दिली.
मनसे नंतर भाजप करणार आंदोलन - शहरात आठ ते नऊ दिवसाला पाणी मिळत असल्याने भाजपने आक्रमकपणे आंदोलन केली. त्याला उत्तर देत शिवसेना नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पाणी प्रश्नावर तातडीने बैठक घेतली. त्यात वाढीव पाणी मिळेल, असे आश्वासन देत पाणीपट्टी पन्नास टक्के कमी केली. मात्र, यातून पाणी प्रश्न कुठे सुटला, असा प्रश्न विचारत मनसे तर्फे आंदोलन सुरु करण्यात आले. तर, पुढील आठवड्यात भाजप देखील विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आंदोलन करणार आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या पाणीप्रश्नावर शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जाईल हे नक्की.
हेही वाचा - Ketaki Chitale Controversy : कोण आहे केतकी चितळे?, का आली अडचणीत