ETV Bharat / city

Aurangabad Renamed Issue : संभाजीनगरच्या मुद्द्यावरून काँग्रेसचे माजी पदाधिकारी उभारणार बंड - congress workers

औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव ठाकरे सरकार जाता जाता पारीत ( Aurangabad Renamed Sambhaji nagar ) केला. यात आधीपासून नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे ( Aurangabad congress workers ) माजी पदाधिकारी आक्रमक झाले असून शहराच्या बदलाच्या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याच्या तयारीत ( congress workers doing Rebellion ) आहेत.

Aurangabad congress workers
काँग्रेसचे माजी पदाधिकारी उभारणार बंड
author img

By

Published : Jul 7, 2022, 3:59 PM IST

Updated : Jul 7, 2022, 4:06 PM IST

औरंगाबाद - ठाकरे सरकारने पाय उतार होत असताना औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांचे नाव बदलण्याचा प्रस्ताव पारीत ( Aurangabad Renamed Sambhaji nagar ) केला. यात आधीपासून नामांतराला विरोध करणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा दिला. मात्र त्यानंतर जिल्ह्यात काँग्रेसचे ( Aurangabad congress workers ) माजी पदाधिकारी आक्रमक झाले असून शहराच्या बदलाच्या मुद्द्यावर आंदोलन उभारण्याच्या तयारीत ( congress workers doing Rebellion ) आहेत.

काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांची प्रतिक्रिया

हेही वाचा - Aurangabad Renamed Issue : संभाजीनगर मुद्द्यावर काँग्रेस माजी पदाधिकाऱ्यांची राजीनाम्याची स्टंटबाजी

माजी शहारध्यक्ष सुरु करणार आंदोलन - शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा प्रस्ताव पारीत होताच काँग्रेस शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांच्यासह जिल्ह्यातील तीनशे पदाधिकाऱ्यांनी आपल्या पक्ष पदाचे राजीनामे दिले. ज्या काँग्रेस पक्षाने धर्मनिरपेक्ष म्हणून आपली प्रतिमा तयार केली. त्याच पक्षातील मंत्र्यांनी मंत्रिमंडळात शहराचे नाव बदलणताच्या प्रस्तावाला मंजुरी कशी दिली, असा संतप्त प्रश्न शहराध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी उपस्थित केला. यापुढे माझ्या शहराचे नाव बदलण्यास माझा विरोध राहील. आम्ही आमच्या विचारधारेला मानणाऱ्या मतदारांना काय सांगायचे. त्यामुळे मी जिल्ह्यातील समाजिक चळवळ चालवणाऱ्या नागरिकांना सोबत घेऊन नामांतर विरोधी चळवळ चालणार असून त्यात वेगवेगळ्या प्रकारची आंदोलन, स्वाक्षरी मोहीम यांच्यासह रस्त्यावरील आंदोलनाचा समावेश उस्मानी हिशाम उस्मानी यांनी सांगितले.

हेही वाचा - Aurangabad Renamed Issue : औरंगाबाद कॉंग्रेसमध्ये भुंकप, संभाजीनगरच्या प्रस्तावाला पाठिंबा दिल्याने तीनशे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

इतिहास मिटू देणार नाही - औरंगाबाद ऐतिहासिक शहर आहे. या शहराच्या वास्तूंसह शहराचे नाव देखील इतिहासाशी जोडलेले आहे. नाव बदलले म्हणजे इतिहास बदलणार नाही. शेकडो वर्षांपासून शहराचे नाव औरंगाबाद आहे. देशात आणि जगात यानावाचं वेगळं वलयं आहे. नाव बदलणे म्हणजे जगात असलेलं वास्तव्य मिटवण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे आमचा विरोध आहे. काँग्रेस पक्षाने आपली भूमिका बदलली असली तरी जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी अद्याप आपली भूमिका बदललेली नाही आणि बदलणार देखील नाही. नियम संगती की शंभर वर्षे जुने नाव असले तर ते बदलता येत नाही. अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. त्याबाबत कागदपत्र जमा करत असून त्याच्या आधारावर आम्ही न्यायालयात दाद मागणार असल्याच काँग्रेस माजी शहाध्यक्ष हिशाम उस्मानी यांनी सांगितलं आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यात काँग्रेसला अंतर्गत बंडाचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा - Shiv Sena Worker Celebration : औरंगाबादमध्ये शिवसैनिकांचा जल्लोष; संभाजीनगर नाव देण्याच्या प्रस्तावाचे स्वागत

Last Updated : Jul 7, 2022, 4:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.