ETV Bharat / city

Aurangabad Crime News : गळ्यात गमछा, डोक्यावर टोपी घालत पोलीस झाले वारकरी; अन् 35 चोरांना केली अटक - औरंगाबाद पोलिसांनी 35 चोरांना केली अटक

एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक वाळूज जवळील प्रती पंढरपूर येथे दरवर्षी येत असतात. तिथे पोलिसांनी वारकऱ्यांच्या वेशात 35 चोरांना अटक केली ( Aurangabad Police Arrested 35 Thief ) आहे.

aurangabad police arrested 35 thief
aurangabad police arrested 35 thief
author img

By

Published : Jul 11, 2022, 3:16 PM IST

औरंगाबाद - एकादशीच्या निमित्ताने हजारो भाविक वाळूज जवळील प्रती पंढरपूर येथे दरवर्षी येत असतात. मात्र, त्यावेळी पाकिटमारी मंगळसूत्र चोरी अशा घटना घडतात. त्यावर उपाय योजना करत पोलिसांनी वारकऱ्यांच्या वेशात गस्त घातली. त्यामध्ये गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या 35 जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच, रविवारी दिवसभरात गुन्हा घडल्याबाबत एकही तक्रार आली नसल्याचं पोलिसांनी ( Aurangabad Police Arrested 35 Thief ) सांगितलं.

पोलीस झाले वारकरी - चोर पकडण्यासाठी पोलीस नवनव्या कल्पना राबवतात. तशी काहीशी कल्पना पंढरपूर यात्रेच्या निमित्ताने राबवली. गर्दीचा फायदा घेत चोर सर्वसामान्यांचे पाकिट, मंगळसूत्र, चेन चोरी करण्याच्या घटना नेहमी घडतात. त्यामुळे या चोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी नामी शक्कल लढवली. साध्या वेशात पोलीस असतात. मात्र, यावेळी वारकऱ्यांच्या वेशात पोलीस तैनात करण्यात आले. 6 पोलीस अधिकारी आणि 60 कर्मचारी तैनात केले. दिवसभरात वारकऱ्यांच्या वेशात असलेल्या पोलिसांनी तब्बल 36 चोरांना पकडत नागरिकांच्या संपत्तीचे संरक्षण केले.

पोलिसांनी केली जनजागृती - आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर भागात दरवर्षी लाखो भाविक येत असतात. त्यामुळे चोरांपासून सावध राहण्यासाठी पोलिसांनी जनजागृती केली. जवळपास 28 ठिकाणी वेगवेगळ्या बॅनरच्या माध्यमातून चोरांपासून सावध राहण्याचे आणि अडचण असल्यास पोलिसांना संपर्क करण्याचे आवाहन केले. तर, येणाऱ्या पालख्यांमध्ये तैनात अधिकारी आणि कर्मचारी यांनी पावली खेळत टाळ मृदंग वाजवत सहभाग घेतला. त्यामुळे पोलिसांची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न केला गेला असल्याच पोलिसांकडून सांगण्यात आलं.

हेही वाचा - Fire By CRPF Constable : जोधपूरमध्ये सीआरपीएफ जवानाचा हवेत गोळीबार, कुटुंबाला ठेवले ओलिस

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.