औरंगाबाद - शहरातील शासकीय रूग्णालयात उपचार घेत असलेल्या एका २६ वर्षीय रूग्णाने मेडिसन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. रविवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास ही घटना घडली.
योगेश छगन डोईफोडे (वय २६, रा.अंतरवाडी) असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या रूग्णाचे नाव आहे. आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात योगेश डोईफोडे हा जखमी झाला असल्याचे रूग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.
औरंगाबाद : चोरट्यांनी तासाभरात हिसकावली 3 मंगळसूत्र, घटना सीसीटीव्हीत कैद
योगेश याने २३ ऑगस्टला सायंकाळी राहत्या घरी विषारी औषध सेवन केले होते. तेव्हापासून योगेशवर घाटी रूग्णालयाच्या मेडिसीन विभागात उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना रविवारी पहाटे योगेशने रूग्णालयाच्या मेडिसीन विभागाच्या दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. ही बाब निदर्शनास आल्यावर वॉर्डातील कर्मचाऱ्यांनी जखमी झालेल्या योगेशला उपचारासाठी अपघात विभागात दाखल केले. या घटनेची नोंद बेगमपुरा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.