ETV Bharat / city

औरंगाबादमध्ये गावठी कट्टा विकणारा अटकेत - चिकलठाणा एमआयडीसी

गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, एक व्यक्ती गावठी कट्ट्याची विक्री करणार होता, या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली.

गुन्हे शाखा पथकाची कारवाई
author img

By

Published : Sep 19, 2019, 8:26 PM IST

औरंगाबाद - शहर गुन्हे शाखेने एका गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी बाळगणाऱ्या व्यक्तीला सापळा रचून अटक केली आहे. फिरोज शेरखान पठाण (रा. आझाद कॉलनी, आयशा मस्जिदीजवळ, करमाड, ता.जि. औरंगाबाद) असे या आरोपीचे नाव आहे.

country made pistol
गावठी बनावटीचे पिस्तूल

गुन्हेशाखेच्या पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, चिकलठाणा एमआयडीसी (MIDC) येथील तथागत चौकात एक व्यक्ती मोटारसायकलवरुन अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करण्यासाठी येणार होता. या माहितीवरून गुन्हे शाखेच्या पोलीस उपनिरीक्षक योगेश धोंडे आणि पथकाने सापळा रचून फिरोज शेरखान पठाण यास अटक केली. या आरोपीची झडती घेतली असता, त्याच्याकडे 1 गावठी बनावटीचे पिस्तूल आढळून आले. यानंतर आरोपीवर सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - काँग्रेसचा मास्टरप्लान ! त्यामुळे पक्ष राज्यात पुन्हा मारणार मुसंडी?

Intro:औरंगाबाद शहर गुन्हे शाखेने एक गावठी बनावटीचे पिस्टल स्वतःजवळ विक्रीसाठी बाळगणाऱ्या इसमाला सापळा रचून अटक केली आहे

Body:गुन्हेशाखेच्या पथकाला गुप्त बातमीदारा मार्फत माहिती मिळाली होती की, चिकलठाणा MIDC येथील तथागत चौक, येथे एक व्यक्ती मोटारसायकलवर अवैधरित्या गावठी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असल्याच्या माहितीवरून गुन्हेशाखेच्या पोउपनि योगेश धोंडे व टिमने सापळा रचुन फिरोज शेरखान पठाण (रा. आझाद कॉलनी, आयशा मस्जिदजवळ, करमाड, ता.जि. औरंगाबाद) यास अटक केली. अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक
गावठी बनावटीचे पिस्टल आढळून आले
फिरोज ही पिस्तुल विक्री करण्याच्या उद्देशाने घेऊन जात असल्याचे समोर आले त्याच्या विरूध्द कलम ३,२५ भारतीय हत्यार कायदा सह कलम १३५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे एम.आय.डी.सी.सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.