औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी दत्ता कचरू भोकरे (वय २७, रा.शिवाजीनगर मुळ गाव येसगाव ता.खुलताबाद) या तरुणाने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान पोलिसांनी त्याला वेळीच रोखले. पोलिसांनी त्याला तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
तरुणांनी टोकाचे पाऊल उचलू नये -विनोद पाटील
दरम्यान या घटनेवर मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले, की ज्या तरुणांसाठी ही आरक्षणाची लढाई लढायची आहे. त्याच तरुणांनी असे टोकाचे पाऊल उचलले तर आपण अतिशय चुकीच्या पद्धतीने जातोय. त्यामुळे सर्व तरुणांना आवाहन आहे, कोणीही असे टोकाचे पाऊल उचलू नये.