औरंगाबाद - येथील समर्थनगरमध्ये जमीन खरेदी-विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या वृद्ध व्यापाऱ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना बुधवारी (दि. 16 मार्च)रोजी दुपारच्या सुमारास घडली. व्यापाऱ्याला येथील त्याच्या कार्यालयात जाऊन मारहाण केली आहे. दरम्यान, साडेतेरा तोळ्यांच्या सोन साखळ्याही लुटल्या आहेत.
मैत्रिणीने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले
या प्रकरणी रात्री उशिरा क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हे शाखेने चौघांना अटक केली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दागिन्यांपोटी लुटमार करण्यासाठी त्यांच्यापैकी एकाच्या मैत्रिणीने सुपारी दिल्याचे तपासात समोर आले आहे. रोहित विठ्ठल बोर्डे, विवेक अनिल गंगावणे (१९ दोघेही रा. फुले नगर, गल्ली क्र. ३ उस्मानपुरा) आणि नदीम खान नजीर खान (रा. शम्स कॉलनी, शहानुरवाडी) अशी अटक केलेल्यांची नाव आहेत. तर, रचना तुळशीराम निंभोरे (रा. सातारा परिसर) असे सुपारी देणाऱ्या महिलेचे नाव आहे.
५ लाख ४९ हजाराचे सोने लुटले
या प्रकरणात व्यापारी अशोक शंकर पाटील यांना त्यांच्या कार्यालयात जाऊन मारहाण करून लुटले होते. त्यांच्याकडून एकूण ५ लाख ४९ हजार २०० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटण्यात आले होते. या दागिन्यांसाठी रचना निंभोरे हिने तीचा मित्र नदीम खॉन नजीर खॉन (रा. शम्सनगर, शहानुरवाडी) याच्या मार्फतीने सुपारी दिली होती.
लुटेलेल्या सोन्याचा ४०-२०-४० नुसर होणार होती वाटणी
लुटलेल्या सोन्यापैकी ४० टक्के रचना निंभोरेस, २० टक्के दागिने नदीम खान व उर्वरीत ४० टक्क्यांची दागिने रोहित बोर्डे याने घ्यायचे, असे ठरले होते. रोहितनेच ही माहिती विश्वास घेतल्यानंतर दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. सहायक पोलीस निरीक्षक मनोज शिंदे यांच्या पथकाने आरोपींचा सीसीटिव्हीच्या आधारे शोध घेऊन आठ तासात त्यांना ताब्यात घेतले व गुन्हा उघडकीस आणल्याची माहिती सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) विशाल ढुमे यांनी दिली.
या टीमने केली कारवाई
ही कारवाई गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शानाखाली सहायक निरीक्षक मनोज शिंदे, सहायक फौजदार विठ्ठल जवखेडे, सतीश जाधव, नजीरखा पठाण, जमादार संतोष सोनवणे, चंद्रकांत गवळी, सुधाकर मिसाळ, भगवान शिलोटे, अश्वलिंग होनराव, नितीन धुळे, संदीप बीडकर, विशाल पाटील, विलास मुठे, नितीन देशमुख, गीता ढाकणे, ज्ञानेश्वर पवार, रमेश गायकवाड यांनी केली.
हेही वाचा - NCP Meeting In Mumbai : नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नाही, मात्र कार्यभार इतर मंत्र्यांकडे